मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 20 जून 2021:-
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील मेघवाडी पोलीस ठाण्यात एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकावर बलात्कार केल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी याने लेडीज पोलीस निरीक्षकाशी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला आहे. तसेच महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी घटनेचे व्हिडिओ देखील तयार केले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी औरंगाबादचा रहिवासी असून, तो एका सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून लेडीज पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्यांचे संबंध व जवळीक वाढली होती. त्यानंतर आरोपीने मुंबईच्या पवई भागात पीडित मुलीला भेटण्यासाठी येत होता. त्यांने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेम संबंध आले होते. आरोपीने त्यासंदर्भात व्हिडिओ तयार केला व त्या व्हिडिओच्या व दोन मित्राच्या मदतीने तिला त्रास देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.
सदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून ११ जून, रोजी मुंबईच्या मेघवाडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमाखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण शून्य एफआयआर अंतर्गत पवई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणा संदर्भात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे एक कोडेच असल्याचे चित्र वाटत आहे.