झीन्नर ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथे बौद्ध महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांच्या कुटुंबा वरती जातीवादी गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला, त्यामध्ये राजेंद्र गरड मंगल गरड, भीमराव गरड, दिलीप गरड, हे गंभीर जखमी झाले आहेत, बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा, सुनील ओहोळ यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन जखमींची विचारपूस केली व घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन त्या जातीवादी गावगुंडांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस अधीक्षक, यांच्याकडे केली,
महाराष्ट्र मध्ये एस सी, एसटी चा लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय-अत्याचार होत असून महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपा काढत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला,गरड कुटुंबास न्याय नाही मिळाला तर, राज्य सरकार, पोलीस प्रशासनाच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला, त्यावेळी बहुजन सत्यशोधक कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मा,बापूसाहेब शिंदे, बहुजन सत्यशोधक संघ, माजी जिल्हाध्यक्ष मा.अनिल सरवदे, माढा अध्यक्ष मा.महेंद्र शिंदे झीन्नर येथील नागरिक उपस्थित होते.