तुषार वाघमारे यांना पीएचडी प्रदान
वार्ताहर दिघंची:
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मधील भूगोल या विषयातून ‘सोसिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल्ड कास्ट पॉपुलेशन इन महाराष्ट्रा विथ स्पेशल रेफरन्स टू सांगली डिस्ट्रिक्ट’ या विषयावरती शिक्षणातील सर्वोच्च पदवी म्हणजेच पी एच डी देण्यात आली. तुषार वाघमारे यांनी पाचवी ते बारावी शिक्षण दिघंची हायस्कूल दिघंची येथे तर पदवीचे शिक्षण आटपाडी कॉलेज आटपाडी येथे पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये भूगोल विषयामधून त्यांनी सुवर्णपदक मिळवले, ते यापूर्वीच नेट, सेट उत्तीर्ण आहेत त्यांना या कामासाठी डॉ. के.सी. रमोत्रा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. प्रशांत पाटील, विद्या चौगुले, प्रकाश वाघमारे व त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.