Press Note / पत्रकार वार्ता
दि. ७.०६.२०२१ रोजी दुपारी : २ .०० वाजता.
स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई
आमंत्रक : अँड. सतीश उके, नागपूर व अँड. समीर शेख , मुंबई – पुणे
विषय : “ देवेंद्र फडणवीस आकांत तांडव का करतोय ?”
याबाबत दि. १९.०३.२०२१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान , मुंबई येथील घेतलेली पत्रकार परिषद यातील “ नागपुरातील मोक्याची ३०० कोटी रुपये किंमतीच्या जमीन करीता आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांचा झालेला खून , या प्रकरनाशी सबंध इत्यादी ” बाबत काही निवडक पुरावे सादर करने. महाराष्ट्र / नागपूर पोलिसात देवेंद्र फडणविसचे (सचिन वाझे सारखे) पोलीस अधिकारी यांना शोधून त्यांचेवर कारवाई होणे करीता या पत्रकार परिषदच्या माध्यमाने शासनास मागणी करणे. या प्रकरणांमध्ये तपास होणे व संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर पदाचा प्रभाव न पाडणे करीता त्यांचे राजीनाम्याची मागणी .
१) नागपुरातील मोक्याची ३०० कोटी रुपये किंमतीच्या जमीन करिता आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांचा झालेला खून, या प्रकरनात देवेंद्र फडणवीस चा संबंध :
राष्ट्रीय महामार्ग नागपूर -वर्धा रोडवर नागपूर शहर विमानतळाजवळील ५.५७ एकर २५०-३०० कोटी रुपये किंमतीची मोक्याची व्यावसाईक उपयोगाची जमीन देवेंद्र फडणवीसला अत्याधुनिक व्यावसायिक संकुल बनविण्याकरिता साम-दाम-दंड-भेद करून कश्याचाही प्रकारे पाहिजे होती. याकरीता फडणविसचा सहाय्यक (P.A.) कुमार मसराम हा आर्कीटेक्ट निमगडे यांचे घरी गेला होता, यात शुक्ला नावाचा मध्यस्थी होता. निमगडे यांचा खून देवेंद्र आणि बावनकुळे यांचा खास भाजपा चा माजी पदाधिकारी , श्रीराम सेनेचा प्रमुख रणजीत सफेलकर रा. कामठी नागपूर आणि साथीदार यांनी केला. सन २०१४ ते २०१९ काळात देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतांना हा खून दडपन्यात आला आणि प्रकरण त्याचे पोलिसांचे मार्फ़त चुकीच्या मार्गाने नेण्याचे आणि आरोपी न शोधने/पकड़ने हे कृत्य घडविण्यात आले.
आर्कीटेक्ट निमगडे यांचा मुलगा अँड. अनुपम निमगडे यांनी नागपूर पोलिसांना ह्या सर्व घटनात देवेंद्र फडणवीस व त्याचे (P.A.) कुमार मसराम यांचा सबंध कधी कसा आला होता हे सर्व सांगितले होते . या घटनेचेवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि गृह खाते त्यांचेकडे होते . मी / अँड. सतीश उके यांची अँड. अनुपम निमगडे सोबत त्याचे वडिलांच्या खून प्रकारनानंतर अनेकदा बोलणे झाले होते . प्रकरण CBI कडे बदलवून नेण्याचा सल्ला मी/ अँड. सतीश उके यांनी दिला होता. या सल्ल्याने अँड. अनुपम निमगडे याने मा. उच्च न्यायालयात Cri. W. P. No. ७१९/२०१६ ही याचिका सादर करून तपास CBI ला बदलवून घेतला, यामुळे देवेंद्रचे सरकारचे अखत्यारीतून तपास बाहेर गेला. या संबंधाने अनेक सबंधित लोकाचे संभाषणाचे रेकॉर्डिंग माझे /अँड. सतीश उके आणि अँड. समीर शेख यांचेकडे सुरक्षित आहेत त्याची प्रत अँड. समीर शेख यांचेकडे संग्रही दिल्या आहेत. यापैकी १८ मार्च २०२१ रोजी झालेले संभाषण याची ध्वनीफीत येथे सोबत देत आहे याप्रमणे पुरावा उपलब्ध आहे. या ध्वनीफीत मध्ये अँड. अनुपम निमगडे यांनी मला/ अँड. सतीश उके यांना देवेंद्र फडणवीस व त्याचे (P.A.) कुमार मसराम याचा नागपूर पोलिसांचे व सी. बी. आई.ला तपासात दिलेले बयानात संबध सांगीतलेला आहे .
सन २०१७ मध्ये रणजीत सफेलकर व त्याचे साथीदार यांनी त्याचे श्रीराम सेनेचे २ मुलांना माझे भाऊ प्रदीपकडे पोलीस स्टेशन अजनीचे हद्दीत माझे कार्यालय सम्राट बिल्डिंग पार्वतीनगर नागपूर येथे पाठवून त्यांनी माझे भावास दबाव टाकून रणजीत सफेलकर याचे कामठी येथील त्याचे घरी व नंतर कार्यालयात घेवून गेले होते . तेव्हा रणजीत सफेलकरने माझे भाऊ कडे टोक करून पिस्टल/ माऊझर त्याचे टेबलवर खिश्यातून काढून ठेवली आणि म्हटले कि “ त्याचे माझे भाऊशी सबंधित ३ जमिनीत अग्रीमेंट झालेले आहेत , त्या तीन जमिनीचे ज्यांचेशी त्याचे अग्रीमेंट झाले आहेत त्या जमिनीचे विवरण व ज्यांनी करून दिले त्यांची नावे सांगितली . त्या जमिनी माझे भावाने त्यास सोडून द्याव्यात असे त्याने म्हटले. यासोबत त्याने यापूर्वी एका जमिनींकरीता आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांनी त्याची जमीन देवेंद्र फडणवीस यांनी मागूनही दिली नाही म्हणून जमीन वाचविने करीता एकनाथ निमगडे कसे जिवंत राहिले नाहीत वैगरे खूप काही बोलला आणि पोलीस त्यांचेच आहेत , सरकार , मंत्री , मुख्यमंत्री त्यांचेच आहेत हे बोलला. त्याने हे बोलला कि निमगडे यांचे प्रकरणात नंतर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचे (सफेलकरचे ) २ मुलांना अटक केली तेव्हा देवेंद्रने सांगीतले तर पोलिसांनी त्या मुलांना कसलेही कारवाई न करता सोडून दिले , तपास सी. बी.आई. ला गेला म्हणून नाहीतर निमगडेच्या मुलासच त्याचे वडिलांचे खुनात पोलिस टाकून देणार होते, असे सर्व माझे भावास बोलून भीती दाखवत रणजीत सफेलकरने माझे भावास त्याने मागितलेल्या जमिनी त्यांना लिहून देण्यास म्हटले. माझे भावाने यावर उत्तर देताच तेव्हा रणजीत म्हणाला कि सतीश तसाही फरार आहे, देवेंद्रने पोलिसांना त्याचे बाबत आदेश दिले आहेत , तो जिवंत परत येणार नाही , आम्हीही त्याला शोधत आहोत. …. तेव्हा ( माझे भावाने) त्यास जमिनी लिहून द्याव्यात नाहीतर सतीश सोबत घरचे लोक अडचणीत येतील , असे तो माझे भावास बोलला . ” तेव्हा सन २०१७ मध्ये त्याचे त्यावेळचे सरकार होते. त्याचेनंतर सन २०१८ मध्ये पोलिसांनी देवेंद्र टीमचे व्यक्तीकडून कडून खोटी तक्रार घेवून आमचे ( मी सतीश उके व माझा भाऊ) विरुद्ध त्या खोटया तक्रारवर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी मला/ सतीश उकेला याला ताब्यात घेतले होते ( या करीता बँक ऑफ महाराष्ट्रने मी/ सतीश उकेचे २००१ साली असलेले खाते, नसल्याची बँकेतील खोटी कागतपत्रे सुद्धा पोलिसांना तयार करून दिली होती), देवेंद्रचा खास पोलीस अधिकारी याने माझे/ सतीश उकेचे अपहरण केले होते आणि ते बिंग फुटलेवर खोटे तक्रारीवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यापूर्वी सन २०१८ मधेच माझे/ सतीश उकेचे सहकारी अँड. अभियान बाराहाते यांना पोलिसांचे हाताने जेल मध्ये टाकण्याची धमकी देवेंद्रचे भाऊ संजय फडणवीस याने दिली होती, त्यावर पोलीस स्टेशन अजनी यांनी काही कारवाई केली नाही. डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे टोळीकडून माझे /सतीश उकेचे कार्यालयावर हमला करून तेथे उपस्थित माझे/सतीश उकेचे नातेवाईकास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांनी अनेकांना बेदम मारले पण पो. स्टे. अजनी, नागपूर पोलिसांनी सर्व आरोपी अटक केले नाहीत तसेच खूप उशिरा खूप विनंतीनंतर जामीनपात्र गुन्हा दाखल केला यात आरोपींना देवेंद्रचे जवळचे लोकांनी जामीन घेण्यास मदत केली , पोलीस स्टेशन अजनी येथे त्यातील एका आरोपी नवी डागोरचे वडिलांनी मला/सतीश उके यांना फडणवीस यांचेशी त्यांचे फोनवरून बोलून घेण्यास म्हटले होते तसेच फडणवीस याचे सोबत समझौता करून घेण्यास म्हटले होते , असे अनेक प्रकार झाले आहेत, याच्या पोलीस तक्रारी करण्यात आल्या आहेत. रणजीत सफेलकर यास गुन्हे शाखा नागपूर पोलिसांनी अटक करेपर्यंत त्याचे कडून मी/सतीश उके व माझे भाऊ प्रदीप यांचेवर सफेलकर टोळीकरून फोन व प्रत्यक्ष त्याचे लोकांचे कडून वरील बाबत सतत दबाव येत होता. एक वेळा मी (सतीशला) घेवून इंदोरा कामठी रोड नागपूर येथील एका फ्लँटवर येण्यास माझ्या भावास म्हटले होते, पण भाऊ एकटाच गेला होता . या बाबत नागपूर पोलिसात अनेक तक्रारी केल्या आहेत त्याचे पोहोच पावती आमचे कडे आहेत काही प्रसंगांच्या व्हीडीओ रेकॉर्डिंग सुद्धा आहेत, हे सर्व पुरावे उपलब्ध आहेत . नागपूर पोलिसात अनेक पोलीस अधिकारी देवेंद्रचे असल्याने व देवेंद्रच्या भीतीपोटी त्याचेविरुद्ध कोणत्याही तक्रारीवर कारवाई करीत नाहीत .
सफेलकर टोळीचे सदस्यांचे फोन माझे भाऊ यांचे फोन वर उपलब्ध आहेत. मला त्या टोळीने सफेलकरशी बोलणे करून दिले, त्यात सफेलकरने मला स्वतः सांगितले होते कि त्याने देवेंद्रचे म्हणणेवर योजना आखून आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांनी त्याची जमीन देवेंद्र फडणवीस यांना दिली नाही म्हणून कसे जीवाने संपविले, ती जमीन वाचविने करीता एकनाथ निमगडे कसे जिवंत राहिले नाहीत हे मला धमकावीने करीता बोलला . त्याने हे सांगितले कि निमगडे यांचे प्रकरणात नंन्तर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचे (सफेलकरचे ) २ मुलांना अटक केली तेव्हा देवेंद्रने सांगीतले तर पोलिसांनी त्या मुलांना कसलेही कारवाई न करता सोडून दिले तसेच कोणाचाही खून केला तर पोलीस त्यांचे काहीही बिघडवत नाही . सी. बी. आई. ने सुद्धा देवेंद्रचे म्हणण्याप्रमाणे केले असे त्याने मला बोलून भीती दाखवत त्याने मागितलेल्या जमिनी त्यांना सोडून लिहून देण्यास म्हटले. असे अनेक पुरावे आमचेकडे आहेत .
याप्रमाणे नागपूर व महाराष्ट्र पोलिसात देवेंद्रचे (सचिन वाझे सारखे ) अधिकारी आहेत ते देवेंद्रचे सांगनेप्रमाणे काम करतात आणि ज्यांना पोलीस शोधून त्यांचेवर कारवाई करीत नाही यामुळे ते देवेंद्राचे काम आजही करीत आहेत. देवेंद्र तसेच त्याचा सहाय्यक (P.A.) कुमार मसराम आणी मध्यस्थी शुक्ला नामक व्यक्ती यांचे बयान देवेंद्र सरकारचे पोलीस यांनी नोंदविले नाही . फडणवीस हे नेहमी जगातील प्रत्येकाचे दुर्गुण दाखवू शकतात आणि स्वतःस स्वच्छ दाखवितात ते या प्रकरणात राज्य सरकारचे तज्ञांना आणी वरील सर्व बाबत ब्रेन मँपिग आणि नार्को टेस्ट स्वखुशीने अर्ज दाखल करून त्या चाचण्या देवून स्वतःचे स्वच्छ प्रतिमेचा पुरावा जनतेला व मिडीयाला देवू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही .
२) पोलीस स्टेशन सोनेगाव नागपूर येथे तरुणीचे लैगिक शोषन व खून करून मृतदेह पोलिसांनी नष्ट केला , याचेशी देवेंद्र फडणवीस यांचा सबंध.
पोलीस स्टेशन सोनेगाव नागपूर येथील बलत्कार आणि खून प्रकरणात देवेंद्र टोळीने एका तरुणीस मुंबईतून नागपूरला सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून आणले, तिचे लैगिक शोषन करून करून तिचा खून करून मृत्यदेह पोत्यात घालून त्या पोत्याचे तोंड बांधून गटारीत टाकले होते , हा मृतदेह नंतर तत्कालीन पोलिसांनी विनाकारवाईचा नष्ट करून शीना बोरा पेक्षा गंभीर प्रकरण , बलात्कार व खून याची घटना ; पोलीस स्टेशन सोनेगाव नागपूर येथिल अप. क्र. २३९/२०१४ यात परिस्थितीजन्य व सहकार्यात्मक पुरावे याआधारे त्यातील गुंतलेले पोलीस अधिकारी यांनी देवेंद्र फडणवीस व त्यांचे टोळीला वाचविणेकरीता केलेले अपराधीक कृत्य बाबत त्या पोलीस अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई होवून आरोपी यांचा शोध घेने व पुढील तपास होनेस मा. मुख्यमंत्री महोदय , मा. गृहमंत्री महोदय व इतर मान्यवर यांना मी अँड. सतीश उके यांनी निवेदन वारंवार दिले आहे.
या घटनेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी या टोळीचा सदस्य चित्रपट निर्माता धरमदास रामाणी याचे कडून खोटी तक्रार लिहून घेतली होती की “ सतीश उके ( त्यांचा विरोधी ) त्या मुलीस पोलिसात ३७६ ची तक्रार त्याचे विरुद्ध करण्यास धाक दडप करतो आहे ” अशी स्वत:चे नावाने भा. ज. पा. प्रदेशअध्यक्ष म्हणून उद्देशून लिहून घेतली होती . हि खोटी तक्रार फडणवीस यांनी त्यांचे पत्र जावक क्र. ४२६ / वि.स.स. / १३ दि. ०४.०६.२०१३ हे त्यावर लावून स्वत: महाराष्ट्राचे गृहमंत्री. आर. आर. पाटील यांच्याकडे जाऊन, त्या तक्रारीवरून सतीश उके यांच्यावर त्वरित पोलीसांचेकडून कारवाई करण्याची मागणी केली होती. अनेक पुराव्यांपैकी एक हा पुरावा उपलब्ध आहे.
याप्रमाणे १२.०६.२०१४ ते १४.११.२०१४ पर्यंत गुन्हा दाखल होनेस जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस टोळीला वाचविणेकरीता नागपूर पोलिसांनी वेळ लावला . दि. १२.०६.२०१४ रोजीच गुन्हा दाखल होणे कायदेशीरपणे आवश्यक होते पण ते देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे दबावात झाले नाही आणि पुरावे अपराधिक षड्यंत्र रचून मिटविण्यात आले , यात आरोपींना वाचविण्याकरीता खोटे कागतपत्रे तयार करण्यात आली आहेत. याचे पुरावे न्यायालयात आणि पोलीस स्टेशनला उपलब्ध आहेत , त्याच्या प्रती आमचेकडे आहेत. वरील गुन्ह्याचे प्रकरणात २-३ साक्षदार, A.D. याचे फिर्यादी /पंच / घटनास्थळ पंच , या त्याच त्या व्यक्ती वारंवार आहेत , जास्त लोकांचा सहभाग पोलिसांनी केला नाही कारण बाहेरील लोकांना सत्य परिस्थिती माहिती होवू नये. मी, सतीश उके यांनी पूर्वीच तक्रार केल्यावरही त्यांचेकडे चौकशी केली नाही, तत्कालीन मुख्यमंत्री (गृहमंत्री) देवेंद्र फडणवीस व त्यांचे टोळीतील सदस्यांचा तपास केला नाही. त्या मुलीचा मृतदेह नष्ट करण्यात मुन्ना यादव , धरमदास रामाणी यांचा सहभाग होता काय याचा तपास केला नाही .
या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस हे मुखमंत्री व गृहखाते त्यांचेकडे असतांना वरील संपूर्ण प्रकार दाबण्याकरीता सोनेगाव पोलिसांनी, यात ज्या पोलीस अधिकारी यांनी खरे आरोपी यांना वाचविण्याचे कृत्य केले या पोलीस अधिकारी यांचे विरुद्धही कारवाई न करता तृटीपूर्ण / खोटा अहवाल लिहून दि. १०.०३.२०१६ रोजी “A” समरी रिपोर्ट तयार करून दि. ११.०४.२०१६ रोजी “गुन्हा खरा परंतु शोध न लागल्याने कायम तपासावर ठेवण्याचा A समरी रिपोर्ट” न्यायालयात सादर केला. हे सर्व कागदोपत्री उपलब्ध आहे. याच्या प्रती आमचेकडे आहेत.
३) तेलगी काळात नागपुरात झालेला बनावट स्टँम्प पेपर घोटाळा, याचेशी सबंध.
सन २००६ साली मी / सतीश उकेने केलेल्या तक्रारीवर तत्कालीन पोलीस उपायुक्त परी.क्र. २ नागपूर ( सध्याचे पोलीस आयुक्त नागपूर श्री अमितेश कुमार) याचे आदेश असूनही आजपर्यंत बनावट स्टँम्प पेपर घोटाळा विरोधात कारवाई झाली नाही . अनेक पोलीस अधिकारी यांनी भ्रष्ट आचरण करून त्यातील आरोपी यांना वाचविले आणि खोटे बहाणे करून कारवाई टाळली. मी फिर्यादि सतीश उके विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले, न्यायालयाचे आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखविली . मंत्रालयात आणि विधिमंडळात आदेश झाल्यावरसुद्धा या टोळीच्या विरुद्ध कारवाई झाली नाही. यात देवेंद्र फडणवीस टोळीच्या फायद्याकरिता मी सतीश उकेचा खून घडवावा याकरीता देवेंद्रचे काही पोलीस अधिकारी वर्षो गिनती खोटे अहवाल बनवून करवाई टाळतात आणि गुंडांना प्रोस्ताहित करतात षड्यंत्र रचतात. मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचेही पालन करीत नाही. सध्याचे मा. गृहमंत्री यांनी मि/ सतीश उकेला पोलीस संरक्षण द्यावे याकरिता दिलेले आदेश यावर संरक्षण देण्यात येवू नये करिता खोटे अहवाल सुद्धा नागपूर पोलिसांनी तयार केले .
नागपुरात तेलगीपूर्वी बनावट स्टँम्प पेपर घोटाळा झाला होता . पोलीस स्टेशन धंतोली येथे अप. क्र. २४३/२००० व पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे अप.क्र. ४०१ / २००० हे दाखल झाले होते . परंतु यात (देवेंद्र टोळीचा) मुख्य सूत्रधार यांचे पर्यंत पोलिसांनी तपास केला नाही. सपोआ अजनी विभाग यांचे पत्र दि. ३.०५.२०१३ व सपोआ सीताबर्डी विभाग यांचे पत्र दि. ३.०५.२०१३ याबाबत उपलब्ध आहे. हा तपास केला असता तर या टोळीपर्यंत पोलीस तेलगीचा बनावट स्टँम्प पेपर घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी पोहचले असते आणि कारवाई झाली असती , हे देवेन्द्र टोळीच्या राजकीय दबावात टाळले गेले . या गुन्ह्यात पोलीस स्टेशन सीताबर्डी , नागपूर शहर येथील पोलीस रेकॉर्ड प्रमाणे पोलीस स्टेशन मधूनच अटक आरोपींना जामीन देण्यात आला , यातील आरोपी भरत शहा रा. MHB काँलोनी , बिल्डीग नं. २८ , काँ. नं. १८५६ , बोरीवली , मुंबई हा फरार होता व आहे तरी त्यात पूर्ण तपास न होता कमकुवत दोषारोपपत्र घालण्यात आले आणि यातील आरोपी निर्दोष मोकळे झाले आहेत. याप्रमाणे सुद्धा त्यातील आरोपीचे विरुद्ध माझे तक्रारीवरून कारवाई होवू नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्यांचे पत्र जावक क्र. ४२६ / वि.स.स. / १३ दि. ०४.०६.२०१३ हे बनावट स्टँम्प घोटाळा चा सुत्रधार धरमदास रामाणी याचे अर्जावर लावून स्वत: महाराष्ट्राचे गृहमंत्री. आर. आर. पाटील यांच्याकडे जाऊन, त्या तक्रारीवरून सतीश उके यांच्यावर त्वरित पोलीसांचेकडून कारवाई करण्याची मागणी केली होती. करीता अनेक पुराव्यांपैकी एक हा पुरावा आहे.
मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ६ नागपूर यांनी दि. ५..१०.२०२० रोजी MIsc. Cri. Appli. No. २२७९ /२०२० यात बनावट स्टँम्प पेपर घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस टोळीचा सहभाग याचे आरोपाबाबत तपास करण्याचे आदेशित केले आहे. परंतु पोलीस स्टेशन सदर नागपूर पोलिसांनी देवेंद्रचे राजकीय दबावात नेहमीप्रमाणे आतासुद्धा आदेशाचे पालन केले नाही या बाबत Misc. Cri. Appli. No. १३ /२०२१ प्रमाणे पोलीस स्टेशन सदरचे अधिकारी यांना मा. कोर्टाने कोर्ट अवमानना नोटीस जारी केलेली आहे .
दि.२०.१२.२०२० चे रात्री देवेंद्र फडणवीसचे लोकांनी मी/ सतीश उकेचे पार्वतीनगर नागपूर येथील कार्यालयात माझे/सतीश उकेचे बाबत विचारणा केली तेव्हा मी/सतीश उके तेथे नव्हतो म्हणून भावास मारहाण केली व अन्य व्यक्तीस (नातेवाईकास) दोन लोकांनी त्याचे हाथ पकडून रोडच्या मधो-मधील डीव्हाडरवर पाडून तिसऱ्याने त्याचे डोक्यावर ८-१० किलो वजनाचा मोठा दगड उचलून घातला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला , यात नेम चुकल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला , यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सांगनेप्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न याचा गुन्हा दाखल न होता केवळ जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीस देवेंद्रचे खास कार्यकर्ते आणि उजवे हाथ अँड. प्रफुल मोह्गावकर यांचे समूहाने न्यायालयातून जामीन करून सोडवून नेले. पोलीस स्टेशन अजनी येथे त्यातील एक आरोपी नवी डागोरचे वडिलांनी मला/ सतीश उकेला फडणवीस यांचेशी त्यांचे फोनवरून बोलून घेण्यास तसेच फडणवीस याचे सोबत समझौता करून घेण्यास म्हटले होते .
या वरील सर्व कृत्यामागे देवेद्र फडणवीस टोळीचे बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्याचे सदस्य आहेत म्हणून पोलीस त्यांना वाचवत आले व देवेद्र फडणवीस त्यांचे बचावात वाचविणेकरीता आले आहेत जेणे करून या घोटाळ्यातील कमाविलेली रक्कम फडणवीस , माजी म.रा. कामगार महामंडळ अध्यक्ष मुन्ना यादव व इतर याचे राजकारणावर व मौजमजेवर खर्च झाली हे उघडकीस येवू नये हा गैरहेतूही त्यामागे आहे . नागपूर पोलिसांनी बनावट स्टँम्प विक्रीबाबत यातील काहीचे विरुद्ध पोलीस स्टेशन धंतोली अप. क्र. २४३/२००० व पोलीस स्टेशन सीताबर्डी अप.क्र. ४०१ / २००० यात त्यातील एक सदस्य बिना यशवंत अडवाणी हिचे विरुद्ध सुद्धा आरोपपत्र दाखल केले होते , परंतु यात या बनावट स्टँम्प घोटाळयाचा मुख्य सूत्रधार यांचे पर्यंत पोलिसांनी तपास केला नाही. या घोटाळ्यातील एक बनावट स्टँम्प पेपर पोलीस स्टेशन अजनी येथे अप. क्र. ३०३/२०१९ यात पोलिसांनी जप्त केला आहे, यातील आरोपी हे देवेंद्र टोळीचे कामात माझेविरुद्ध खोटी तक्रार देणारे देवेंद्र टोळीचे सदस्य आहेत म्हणून पोलीस त्यांना अटक करीत नाहीत. करीता पोलीस स्टेशन धंतोली अप. क्र अप. क्र. २४३/२००० व पोलीस स्टेशन सीताबर्डी अप.क्र. ४०१ / २००० यातील तपास अधिकारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करनेस मी / अँड. सतीश उकेने अर्ज दिला होता. त्यानंतर गुन्हे शाखा नागपूर पोलिसांनी या बिना यशवंत अडवाणी व तिचे साथीदारांस जुन्या तारखेचे स्टँम्प पेपर विक्री करतांना सापळा रचून दि. २४.०५.२०२१ रोजी अटक केली आहे.असे अनेक घटना घडलेल्या आहेत.
४) असे अनेक अपराधिक प्रकारात संबंध आणी संरक्षण .
असे अनेक अपराधिक प्रकार देवेंद्र व त्याचे संरक्षणाखाली झाले आहे . यावर कधीही कारवाई होवू नये म्हणून देवेंद्र सत्ता पक्षात असतांना किंवा विपक्षात असतांना सरकारी अधिकारी व पोलिसांना दबावात ठेवतो . पहिले तो व त्याचे भाऊ सर्वाना धमकाविणे करिता “२०१९ मध्ये आम्हीच येवू” असे म्हणायचे. आता देवेंद्र व त्याचे साथीदार म्हणत असतात कि ते लवकरच सरकार पाडणार आहेत , आता २ महिन्यात पडणार आहे , तीन महिन्यात पडणार आहे , असे म्हणून नेहमी पोलिसांना धाकात ठेवतात जेणे करून पोलीस त्यांचेवर वाटल्यास कोर्ट अवमानना सहन करतील पण कारवाई करण्यास धजावत नाहीत . कायद्याने स्थापन झालेले सरकार वारंवार पाडू असे म्हणून वारंवार समाजात अस्थिरता निर्माण करणे हा एकप्रकारचा राजद्रोह ते वारंवार करीत आहेत .
करीता हे आमचेकडे असलेल्या भरपूर पुराव्यापैकी हे वरील नमूद काही निवडक पुरावे आपल्या माहितीस सादर आहेत. भविष्यात, यापूर्वीप्रमाणे देवेंद्र टोळीचे कोणत्याही षड्यंत्राने किंवा mob lynching मध्ये वरील कारणे, पोलीसांचे दुर्लक्षाने किंवा मदतीने आम्हास मदत न मिळाल्यास आमचे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास वरील प्रकरणांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने आमचेवर पुरावे न दिल्याचे आरोप होवू नये म्हणून हे पुरावे देत आहोत.
महाराष्ट्र / नागपूर पोलिसात देवेंद्र फडणविसचे (सचिन वाझे सारखे) पोलीस अधिकारी यांना शोधून त्यांचेवर कारवाई होणे करीता या पत्रकार परिषदच्या माध्यमाने शासनास मागणी करण्यात येत आहे. तसेच या वरील प्रकरणांमध्ये तपास होणे व संपेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणेवर / पोलिसांवर पदाचा प्रभाव न पाडणे करीता त्यांचे राजीनाम्याची या पत्रकार परिषदच्या माध्यमाने मागणी करण्यात येत आहे.
नागपूर
दि. ७.०५.२०२१ (अँड. सतीश म. उके) मो.क्र.७७९६३२३३३४
(Note- वरील प्रेस नोट आहे व याबाबत संपादक जबाबदार नसतील अथवा www.janvidrohi.com सत्यतेबाबत जबाबदार नसतील )