मराठा आरक्षण; पुरोगामी महाराष्ट्र मध्ये खासदार संभाजी राजे,adv बाळासाहेब आंबेडकर, छगन भुजबळ व महादेव जानकर यांची युती झाल्यास…..
लेखक डॉ.कुमार लोंढे
(अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन)
मो.9881643650
मराठा आरक्षण निमित्त कोल्हापूर येथील शाहूशक्ति आणि भीमशक्ती याचे अनोखे दर्शन पहावयास मिळाले यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.16 जून चा मोर्चा निमित्त जरी मराठा आरक्षणाचे असले तरी बरेच संदर्भ सांगून जातात. महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी विचारधारे ची झालर नव्हे किनार आहे महाराष्ट्राने देशाला फुले-शाहू-आंबेडकर दिलेले आहेत काही उद्देशाने कमी-जास्त प्रमाणामध्ये हे पुरोगामी विचार इतर राज्यांनी स्वीकारले आहेत . छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना मराठा मूक मोर्चास निमंत्रित करून एक सामाजिक सलोख्याचा संदेश दिलेला आहे. मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातील दावे-प्रतिदावे ? राज्य सरकारची भूमिका? केंद्र सरकारचे धोरण? 102 वी घटनादुरुस्ती?मागासर्वगिय आयोग? या मोर्चा मागे भाजपा आहे का? यातून महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का?हा मुद्दा केंद्राच्या अखत्यारित येतो की राज्याच्या अखत्यारीत येतो यावरून मोठे घमासान आणि सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तसेच अगदी सुशिक्षित वर्गांमध्ये तर्क-वितर्क लढवले जात आहेत . मग मराठा आरक्षणाची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशी व्यवस्था कोणी निर्माण करू पाहत आहे का ?मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण शिकार करू पाहत आहे का ?मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा करून बहुजन वर्सेस मराठा हा वाद पेटला जातोय का ? गुणवंत सदावर्ते व जयश्री पाटील खरंच भाजपा व संघाच्या इशाऱ्यावर चालतात का सर्व अफवा आहेत? सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळले आणि त्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या त्या काही प्रतिक्रिया या कट्टरवादाच्या व बौद्ध समाजास जाणीव पूर्वक टार्गेट करणाऱ्या आहेत या सर्व घटना ताज्या आहेत.मग या पाठीमागची कारणे काय आहेत याचा ही शोध महत्वाचा आहे.
लोहा तालुक्यातील जामगा शिवनी, परभणीतील खारड़ा, कंधार मधील गोणार, फलटण मधील घटना म्हणजे मराठा समाजाकडून आक्रमक असणाऱ्या बौद्धांना अडवण्याचा प्रयत्न आहे व या आडून वेगळेच राजकारण होताना दिसते आहे राज्याचे पोलीस महासंचालक बौद्ध आहेत पुरोगामी सरकार म्हणून ढोल बडवणारे महाविकास आघाडी सरकार व राज्यातील गुप्तचर यंत्रणा यातून काहीच बोध घेत नाही ! गृहमंत्री जागे व्हा! राज्यातील वातावरण दूषित करणारे मनुवादी किडे शोधून वेळीच ठेचून काढा नाहीतर आपली ही सर्व बाबीस मूक संमती आहे असे समजण्यास हरकत नाही. सत्तेच्या पोळी साठी जिवंत माणसाचे मुडदे पाडून त्यावर पोळ्या भाजू नका कारण इथला युवक तो मराठा असेल अथवा बौद्ध असेल अथवा बहुजन तो जागृत झाला तर सत्तेच्या पटलावरील तुम्ही मुडदे बनाल हे मात्र खरे आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील बौद्धांवर हल्ल्याचे प्रमाण वाढलं आहे आणि या कारणाचा शोध घेतल्यास गुणवंत सदावर्ते हे बौद्ध समाजातील आहेत जयश्री पाटील या मराठा समाजाचे आहेत व त्या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत त्यामुळे मराठा विरुद्ध बौद्ध हा वाद या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो आहे कारण ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्यामध्ये त्यामध्ये बहुसंख्य लोक मराठा समाजाचे आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकूवून ठेवणे हे मोठे आव्हान असताना 16 जून चा मोर्चा हा ऐतिहासिक दिवस आहे. हा सलोखा घट्ट झाल्यास महाराष्ट्र मध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. मुद्दा असा आहे की खासदार संभाजीराजे खासदार उदयनराजे यांच्या पाठीमागे जर मराठा समाज एकवटला आणि बहुसंख्य समाजाने या दोन नेतृत्व यांना मान्य केले तर येणाऱ्या काळामध्ये सत्तेचे समीकरण हे दोन्ही राजे व बाळासाहेब आंबेडकर ,छगन भुजबळ व महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक वेगळी आघाडी निर्माण झाली तर सत्तेची गणिते बदलू शकतात यास शंका घेण्याचे कारण नाही. शिवसेना ,भाजप राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षाच्या पालथ्या घड्यावर पाणी पडल्याशिवाय राहणार नाही परंतु ही युती होणे फार महत्त्वाचे आहे. जर युती नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्षांची व जातीवादी पक्षांचे मनसुबे हे मजबूत होणार आहेत हे मनसुबे धुळीला मिळवायचे असतील तर दोन महाराज ,बाळासाहेब आंबेडकर ,छगन भुजबळ साहेब व महादेव जानकर साहेबानी पुढाकार घेऊन युती करून महाराष्ट्रामध्ये सत्तेचे समीकरण बनवलं तर महाराष्ट्रात या चौघांच्या नेतृत्वाखालील सरकार बनू शकते आणि येथील मनुवादाचे पितळ उघडे पडू शकतं हे सत्य नाकारता येणार नाही.
लेखक संपादक जनविद्रोही