केंद्र सरकार च्या चुकीच्या ध्येय धोरणां मुळे पेट्रोल आणि डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत.त्याचप्रमाणें खाद्य तेल 200 च्या पुढे गेले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील शोषित, वंचित, पीडित,कष्टकरी, शेतकरी,समाज देशोधडीला लागला आहे. ह्या दरवाढी मुळे त्याला त्याचे दैनंदिन जीवन जगायला खूप अवघड आणि बेताचे झाले आहे.त्यामुळे महागाई मुळे महाराष्ट्रातील ,शोषित, वंचित, पीडित,शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी,महिला वर्ग यांच्या दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे हे आत्महत्या चे प्रमाण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रीत ध्येयधोरनांनी वाढवलेल्या महागाई मूळे होत आहे. त्या मुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली महागाई लवकरात लवकर कमी करावी आणि तुम्हाला जर महागाई कमी करता येत नसेल तर तुमच्या खुर्च्यां खाली करा.आशा प्रमुख मागण्यांना घेऊन बहुजन मुक्ती पार्टी माळशिरस तालुका युनिट यांच्यामार्फत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मा.काकासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस मधील सर्व बहुजन महापुरुष यांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या पासुन तहसिल कार्यालय माळशिरस अशी शेकडो 2 व्हीलर ,3,व्हीलर,4 व्हीलर गाड्यांना धक्का मारत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या महागाई विरोधातील ध्येय धोरणांच्या विरोधात आंदोलन करून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार राज्य सरकार यांचा विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.व मा.तहसीलदार तुषार देशमुख यांना मागण्यांचे पत्र राष्ट्रपती यांना पाठवण्यासाठी दिले.
यावेळी ऍड.सीताराम सोनावले ऍड तुकाराम राऊत,डॉ.कुमार लोंढे,सौरभ वाघमारे ,संतोष गेजगे यांनी मार्गदर्शन केले.तसेच
मैत्री प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे.माहिती सेवाभावी संस्थेचे महेंद्र साठे,आरपीआय चे ता.अध्यक्ष प्रदीप सरवदे,जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भांगे,प्रहार चे अविनाश सोनवणे,नीता सुळे मॅडम सह मौर्य क्रांती संघटनेचे सत्यवान दुधाळ,भारतीय विद्यार्थि मोर्चाचे किरण बोलगड, सुदेश झेंडे, गणेश उदगिरे, सामाजिक कार्यकर्ते लखन बेंद्रे,हृतिक चव्हाण सह माळशिरस मधील सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनि या धक्का मारो आंदोलनाला साथ समर्थन दिल..
या धक्का मारो आंदोलनाची तयारी रिकेश चव्हाण,नागेश वाघंबरे,आबासाहेब वाघमारे ,श्याम मंडले,दिलीप बोडरे,दुर्गेश काळुंके,विशाल आगवणे ,सह आदींनी केली