बीजेपी व आरएसएस ची नियोजित 2024 ची टीम आज कोल्हापूर मध्ये उतरणार. आम्ही आज पर्यत हेच सांगत होतो की लोकांच्या भावनांचा फायदा घेवून बहुमत कस तयार करायचे हे बीजेपी कडून शिका. 3 वंशज उद्या बीजेपी व आरएसएस च्या इशरयावर महाराष्ट्र सरकार च्या विरोधात रस्त्यावर येणार आहेत हे विसरु नका. हा मूक मोर्च्या केंद्र सरकार च्या विरोधात नाही तर महाराष्ट्र सरकार च्या विरोधात आहे.
महाराष्ट्रतून देवेंन्द्र फड़नवीस सह बीजेपी सरकार ला रोखण्यासाठी कांग्रेस-एनसीपी-सेना एकत्र आली आणि बीजेपी चे पुन्हा मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंग झाले. आणि ब्राम्हण-ब्राम्हनेतर वाद पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात उफालूण आला.
एक बाब आपल्या निदर्शनास आली असेल की ब्राम्हण 3% असून 97% ब्राम्हनेतर, व धार्मिक अल्पसंख्यक लोकांवर राज्य कसे करतात. एका ब्राम्हण फड़नवीस ला मुख्यमंत्री करण्यासाठी व महाराष्ट्रातील ब्राम्हनेतर महाविकास आघाडी चे सरकार पाड़न्यासाठी ब्रामण लोक कशा पद्धतीने ब्राम्हनेतर लोकांचा उपयोग करत आहेत.
आज राज्यात ओबीसी, एस सी, धनगर, मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला कोणाच्या विरोधात तर ब्राम्हनेतर लोकांच्या विरोधात म्हणजे आपन ब्राम्हनेतर लोकांणी ब्रामणा च्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे तर आपन कोणाच्या विरोधात उतरलो आहोत. आपल्याच लोकांच्या म्हणुन ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नवंबर 1949 च्या भाषण जो ईशारा दिला होता तो पुन्हा एकदा आज खरा ठरत आहे.
ब्राम्हणवाद मजबूत करण्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जात आहे. इतिहास राजे महाराजे मिळून ब्रम्हणवादाचे रक्षण करत होते, आणि आता त्यांचे वंशज मिळून तेच काम करत आहेत.
35 च्या वर मोर्चे काढून मराठा रक्षणाचा मुद्दा सुटला नाही, मग आता कोल्हापुरचा मोर्च्या नेमका कशासाठी आहे, याचे चिंतन मराठा- व गैर मराठा भावांनी पन करने गरजेचे आहे.
माझा मराठा अरक्षणाला विरोध नाही. जे ज्याच् आहे ते त्यांना मिळालच पाहिजे, मात्र ही तीन वंशज आरएसएस च्या इशरयावर एकत्र येवून मराठा आरक्षणाचा पुळका दाखवत आहेत तो खोटा पुळका आहे.
खरच यांना जर अराक्षणा मिळवून दयाचे आहे तर बाकी संभाजी राजे व उदयन महाराज यांच सोडा प्रकाश आंबेडकर स्वतः एक विद्वान व अभ्यासू नेते आहेत, त्याच बरोबर ते स्वतःला वकील ही असल्याचे सांगतात, आणि काही शहरी नक्षलवादी लोकांचे वकिलपत्र घेवून हाइकोर्ट मधे ही उभे राहतात मग मराठा आरक्षणाच वकील पत्र का घेत नाहीत?
एक गोष्ठ आता निचित झाली आहे की मराठा आरक्षण हे न्यायालयाने नकारले आहे. आणि त्यासाठीच जे काही करायचे आहे ते न्यायालयातच करावे लागणार आहे. मग पुन्हा मोर्चे कशासाठी? यावर लोकांनी विचार करून या तिन्ही वंशजा पासून दूर राहण्याची गरज आहे.
खरच आरक्षण हव असेल तर राजकीय स्टंट करण्यापेक्षा न्यायालयीन लढाई मजबूत करा, तोच एकमेव व अंतिम मार्ग आहे.
कपिल के सरोदे