आटपाडी प्रतिनिधी/
आटपाडी पोलिसांच्या विरोधात १६जुन रोजी धरणे आंदोलनाचा इशारा.
दिघंची येथील सुमन नवनाथ बुधावले या महिलेस काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून विनयभंग केला असल्याची तक्रार आटपाडी पोलिसात देण्यासाठी गेले असता आटपाडी पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंद न करता उलट त्या महिलेला दमदाटी करण्याचा प्रकार आटपाडी पोलिसांनी केला असल्याचे व या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण करून विनयभंग केला आहे त्यांनी तुझ्यावर व तुझ्या कुटुंबावर खोट्या केसेस टाकून जेलची हवा खावी लागेल अशी धमकी दिली असल्याचे निवेदन तहसीलदार आटपाडी यांना दिले आहे.
“रामोशी समाजाचा फक्त राजकारणात उपयोग करायचा हे आता चालणार नाही आम्हाला न्याय पाहिजे अन्यथा आम्ही ही ठोशास ठोसा या पद्धतीने उत्तर देऊ- प्रेमराज चव्हाण”युवा उद्योजक
पुढे या निवेदनात म्हटले आहे की समाधान श्रीरंग नळ, श्रीरंग नळ, बाळू नळ, योगेश महादेव नळ, यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून संबंधित महिलेस खाली पाडून मारहाण केली आहे व महिलेच्या पतीस मारहाण केली आहे व जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार आटपाडी पोलिसात नोंद करण्यासाठी गेले असता पोलिसांनी विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली व पोलिस स्टेशन मधून हाकलून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदन आटपाडी तहसील दार यांना दिले आहे. या महिलेची तक्रार आटपाडी पोलिसांनी विनयभंगाची तक्रार त्वरित नोंद करून न घेतल्यास संबंधित महिलेच्या वतीने दिनांक 16 /6 /20२१ रोजी आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे व आंदोलनाची पूर्णपणे जबाबदारी ही शासनावर ती राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.