मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 12 जुन 2021:-
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्री.प.ख.जाधव यांचावर देशद्रोहाचा गुन्हा,दाखल करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस ठाण्यात आँनलाईन पध्दतीने रिपोर्ट दाखल करण्यात आली आहे. टोकन क्रमांक 256/2021 आहे.दाखल करणारे खुद्द जागृत नागरिक, तलाठी विनोद खोब्रागडे महसूल विभाग चंद्रपूर हाच आहे
उपसचिवानी भारतीय संविधानातील अनुच्छेद 51क चे उल्लंघन केलेले आहे.
उपसचिव जाधव यांनी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेश व निर्देश न घेता,व त्यांच्या नावाने पत्र न काढता ,व तसे पत्रात नमुद न करता, स्वतःचाच स्वाक्षरीने दिनांक 6/6/2021 रोजी,छत्रपती शिवाजी महाराज यांचा, शिवराज्याभिषेक निमीत्ताने, ग्रामपंचायत,पंचायत समीती,व जिल्हा परिषद,येथे राष्ट्रीय ध्वज तिरंगा ऐवजी भगवा ध्वज फडकवावा असे पत्र काढले ,व ते संविधान विरोधी आहे. जर उद्या ,निजामाला माननारे,मोगलांना माननारे,पेशवांना माननारे,किंवा ईतर समाजातील महापुरुषानां माननारे,शासनात आले तर आपण त्यांचाही ध्वज शासकीय कार्यालयात फडकवणार आहात काय.? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजेशाही संपुष्टात येऊन,भारत देशात,भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून संपूर्ण देशात लागु झाले आहे, एक राष्ट्रीय तिरंगा ध्वज,एक राष्ट्रीय गित, लागु झाले आहे. हे शासन ,प्रशासन, यांना माहिती नाही काय.?? आपल्या भारत देशात भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 नुसार,सर्व धर्म समभाव प्रमाणे आपापले उत्सव साजरे करता येतात, मात्र सरकारी कार्यालयात भगवा ध्वज फडकवावा असे पत्र शासनाने देने योग्य नाही.ते संविधान विरोधी आहे.
म्हणून महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्री. प.ख.जाधव यांचावर I P C कलम 124 अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रिपोर्ट दिली आहे, टोकन क्रमांक 256/2021 नुसार रिपोर्ट दाखल झाली आहे.अशी माहिती विनोद खोब्रागडे महसूल विभाग यांनी दिली असून संविधानाच्या विरोधात कोणी काय केले तर त्यासाठी जागृत असणाऱ्या नागरिकांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्येच आहे. असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.