लोकशाही भारताला हिंदुराष्ट्र बनवायचे कि ब्राह्मणराष्ट्र? हेच आहे का आरक्षण??
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 12 जुन 2021:-
राममंदिर ट्रस्टमध्ये एखादा मराठा, कुणबी,धनगर, माळी, वंजारी, कोळी, न्हावी, सुतार, लोहार, चांभार, यादव, पटेल, मौर्य, तेली, रजक, जाटव, पासवान, नाई, गुर्जर, जाट, दलित, आदिवासी असेल तर दाखवा….? काय या जातीमध्ये कोणीच लायक नव्हते? हे तर काहीच नाही, महाराष्ट्रातला एखादा… वारकरी संप्रदायाचे महाराज कीर्तनकार सुद्धा घेतले नाहीत? काय कारण तर फक्त सनातनी ब्राम्हणच हिंदू आहेत? आणि बाकीचे बहुसंख्य लोक हिंदू नाहीत? कारण धर्मांत वर्ण आहेच…हा जातीवाद नाही तर काय आहे? 1) महंत नृत्य गोपाल दास – राम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष. 2) चंपत राय – महासचिव. 3) गोविन्द देव गिरी. 4) स्वामी परमानन्द. 5) कामेश्वर चौपाल. 6) डॉ अनिल मिश्रा 7) विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा 8) महंत दिनेन्द्र दास. 9) अवनीश अवस्थी. 10) अनुज झा – डी एम. 11) कृष्ण गोपाल दास . 12) नृपेंद्र मिश्रा 13) के के शर्मा. 14) कमल नयन दास. 15) जगतगुरु वासुदेवानंद सरस्वती. 16) स्वामी विष्णु प्रसंतीर्थ महाराज. 17) के परासरन वरील सर्व एका जातीतील आहेत.फक्त ब्राम्हण. यालाच म्हणातात जातीयवाद..! हे आहे असली आरक्षण ?
त्यांना हिंदुराष्ट्र नाही ब्राम्हणराष्ट्र बनवायचा आहे.?? आपल्या ९०% लोकांनी फक्त धर्माच्या नावावर मरायचे व मलिदा खायला हे ३% सनातनी मनुवादीनी ?? शेतकरी कष्टकरी बांधवांनो हे षडयंत्र ओळखून जागे व्हा. मंदिर मस्जिद आपले विषय नाहीत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यवसाय, शेती हे आपले विषय आहेत. हक्क अधिकार मिळावे म्हणून संघर्ष करण्याची गरज आहे .देणगी देण्याअगोदर शिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेल्या युवा पिढीने विचार करुन देणगी कुठे द्यायची?? खरी गरज कशाला आहे? शैक्षणिक आरोग्य की मंदिर?