माणदेशाच्या विकासात डॉ.गावडे यांचे योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन बळीराजा शेतकरी संघटना सांगली जिल्हाअध्यक्ष डॉ उन्मेश देशमुख यांनी आज म्हसवड येथील संचित हॉस्पिटलला सदिच्छा भेट प्रसंगी अनमोल विचार व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ.देशमुख म्हणाले
“माणदेशातील जनतेसाठी कोरोना काळात डॉ प्रमोद गावडे आणि डॉ विलास सावंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करून दुष्काळी, शेतकरी, कष्टकरी जनतेची सेवा केली,त्याच प्रमाणे माणदेशात आणि महाराष्ट्रात म्हसवड येथे लोकसहभागातून पहिले कोव्हिड हॉस्पिटल उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे”
त्यानी केलेल्या कार्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडावी अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या वेळी डॉ देशमुख यांचा सत्कार डॉ.गावडे व डॉ. सावंत यांनी केला या कार्यक्रमास जय हनुमान तालीम संघ म्हसवड चे संचालक पै विलास रुपनवर ,श्री राजेंद्र माने,डॉ दिगंबर मोरे,दत्ता पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.