🍪 कमी भांडवलात उभारा – पापड उदयोग
👉Papad Manufacturing Business – घरातल्या जबाबदारीतून थोडीशी फुरसत मिळाली की गृहिणींना रिकामे-रिकामे वाटायला लागते. नोकरी करता आली नाही तरी एखादा छोटेखानी व्यवसाय करता आला असता तर, असेही वाटून जाते. अशा गृहिणींसाठी करता येण्याजोग्या व्यवसायाचा पर्याय म्हणजे पापड उदयोग होय.
👉महाराष्ट्रातील तयार होणाऱ्या पापड उदयोगास विविध राज्यातून मोठया प्रमाणात मागणी चांगली वाढत आहे. वैयक्तिक व बचत गटातील महिलांना हा उदयोग करता येण्यासारखा व्यवसाय आहे. पापड उदयोगास सहजासहजी बाजारपेठ उपलब्ध असते.
पापड –
👉पापड हा भारतातील व महाराष्ट्रातील प्रचलित असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ विविध प्रकारे बनवला जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधर्म आहे. पापड उडीद हे कडधान्य वापरून प्रामुख्याने बनवले जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ पापड बनवण्यास वापरले जातात. उदा. पोहे, नागली इत्यादी. पापड कुर्कुरीत होण्यासाठी पापड बनवताना त्यात पापडखार वापरला जातो. पापड टिकून राहण्यासाठी पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आदी रसायने वापरली जातात. त्यामुळे त्याचा स्वाद व गुणधर्म कायम राहतो.
👉पूर्वी जेवणासोबत पापड खाल्ला जात असे. आता जेवणाआधी सुरुवात म्हणून पापड खाण्याची पद्धत सर्वत्र सुरु झाली आहे. त्यामुळे पापडाची मागणी ही दररोज वाढत आहे.
पापडाचे प्रकार –
👉पोहे पापड, नागली पापड, तांदळ्याचे पापड, मूगाचे पापड, बटाट्याचे पापड, शाबुदाना पापड, हरभराचे पापड, मटकीचे पापड आदी सह विविध प्रकाराचे पापड हे तयार केले जातात. बाजरपेठे मध्ये वरील प्रकारच्या पापडाना मोठी मागणी असते.
उपलब्ध बाजारपेठ –
👉 महाराष्ट्रात मोठया प्रमाणात खाद्या संस्कृती पाहण्यास मिळते. सध्या बाजरामध्ये लिज्जत पापड, रामबंधू पापड, सुहाना पापड, एव्हरेस्ट पापड, आदींसह विविध बचत गटांचे पापड हे विविध बाजारपेठा मध्ये उपलब्ध आहे. पापडास ठोक विक्रते, किरकोळ दुकानदार, हॉटेल, विविध अर्थिक विकासाची केंद्रे आदी ठिकाणी पापडास चांगली मागणी आहे. व पापड उदयोगास एक चांगले मार्केट दिवसेंदिवस तयार होत आहे.
पापड उदयोग –
👉हा उदयोग आपण घरगुती स्वरूपात अथवा बचत गटांमार्फत सुध्दा केला जाते. यासाठी साधारण १००० चौ.फूट जागा लागते. तसेच वीज व पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता या उदयोगासाठी भासते. तसेच पापड तयार झाल्यावर पापडाचे पॅकिंग आकर्षक व उत्तम माल, वाजवी दर ठेवल्यास मालास मागणी वाढते. हा उदयोग कमी भांडवलात पापड उदयोग उभा राहू शकतो.
प्रकल्प विषयक –
👉पापड उदयोग उभारणीसाठी साधारण १ ते १,५० लाख रू. पर्यंत खर्च येऊ शकतो. या उदयोगास सुध्दा बॅक आपली पतपाहून आपणांस कर्ज पुरवठा करते. तसेच विविध शासकीय योजनाचा लाभ या उदयोगास मिळतो.
🎯 व्यवसाय साक्षर व्हा…..
🎯 उद्योजक बना….
अर्थक्रांती
साभार – udyojak maharashtra