🔹7 मुलं आणि 3 मुलींना माऊलीने दिला जन्म.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-
दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरियात ही घटना घडली असून, काही दिवसांपूर्वीच एका मातेने नऊ बाळांना जन्म दिला होता. मात्र या माऊलीने दहा बाळांना जन्म देत नवा विक्रम केला आहे.
गोसिआम थामारा सिथोले या महिलेच्या नवऱ्याने सांगितलं की प्रसूतीपूर्व चाचणीत आठ मुलं असल्याचं दिसलं होतं. मात्र प्रत्यक्षात दहा मुलांना जन्म दिला आहे. सात मुलं आणि तीन मुलींना या माऊलीने जन्म दिला आहे. भावुक करून टाकणारा क्षण आहे. मी आता फार काही बोलू शकत नाही असं या महिलेचे पती तेबोहो सोटेट्सी यांनी बोलताना सांगितले आहे.
37 वर्षीय सिथोले यांना याआधी जुळी मुलं आहेत, ती सहा वर्षांची आहेत.
सिझेरियन पद्धतीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सिथोले यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेतील एका अधिकाऱ्याने दहा बाळांच्या जन्माला दुजोरा दिला मात्र एका अधिकाऱ्याने अजून दहा बाळांना पाहिलं नसल्याचं सांगितलं.
आम्ही यासंदर्भात शहानिशा करत असल्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
2009 मध्ये अमेरिकेत आठ बाळांना जन्म दिला होता. एकाच वेळी सर्वाधिक बाळांना जन्म देण्याचा विक्रम या महिलेच्या नावावर आहे.
मात्र गेल्या महिन्यात 25 वर्षीय हलिमा सिस यांनी मालीत एकाचवेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मोरोक्को इथे असलेल्या हलिमा यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं आहे.
एकाच वेळी अनेक बाळांना जन्म देणाऱ्या प्रसूती निर्धारित वेळेआधी होतात असं बीबीसीचे आरोग्य प्रतिनिधी ऱ्होडा ओढियांबो यांनी सांगितलं.
तीनपेक्षा अधिक मुलांना जन्म एकत्र होणं दुर्मीळ असतं. फर्टिलिर्टी अर्थात कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा प्रक्रियेत असं होऊ शकतं. मात्र सिथोले यांना नैसर्गिकरीत्या एवढी मुलं झाली आहेत. प्रार्थना करत आणि जागून काढलेल्या रात्री
महिनाभरापूर्वी सिथोले यांनी प्रिटोरिया न्यूजशी बोलल्या होत्या. हे बाळंतपण आव्हानात्मक होतं. सगळ्या बाळांची प्रकृती चांगली असावी म्हणून मी प्रार्थना करत होतो. त्यांची तब्येत कशी असेल या विचाराने मी अनेक रात्री जागून काढल्या.
गर्भाशयात इतकी सारी बाळं कशी सामावतील याची मला काळजी होती. ती सगळी सुरक्षित राहतील ना? असे प्रश्न सिथोले यांना पडत असत. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. गर्भाशयाची वाढ होऊन ते मोठं झालं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.
लहान बाळांचा जन्म.
एवढी मुलं गर्भाशयात असताना सिथोले यांचे पाय दुखत असत. दोन मुलं चुकीच्या गर्भाशयात असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.
त्या समस्येचं डॉक्टरांनी निराकरण केलं. तेव्हापासून माझी तब्येत स्थिर आहे. माझ्या बाळांच्या आगमनासाठी मी अतिशय आतूर आहे असं सिथोले त्यावेळी म्हणाल्या.
या बाळांच्या आगमनाने सिथोले यांच्या पतीला प्रचंड आनंद झाला. ही देवाचा आशिर्वाद असलेली लेकरं आहेत असं त्यांनी सांगितलं. हा चमत्कार आहे.
याआधी दहा मुलांचा जन्म दोनदा झाला आहे. मात्र यापैकी कोणतीही मुलं फार काळ जगू शकली नाहीत.