🔹फार्मा सेक्टरमध्ये भस्म्या झोंबला का ❓
🔹मार्केट ची मानसिकता तयार करण्याचा फंडा?
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 10 जून 2021:-
कोरोना च्या काळात वर्षभर लहान मुले घरातच आहेत. आणि राहतात. तरीही आता तिसरी लाट येणार ? आणि ती पोरांवर येणार अशी अफवा पसरवून दिली आहे.
त्यात आता महाराष्ट्र सरकार म्हणतेय की ‘” फ्लू ची लस द्यायची आहे आणि ती घेतलीच पाहिजे ‘” असेही लहान मुलांच्या पालकांना वाटणार…. मग ते लस घेण्यासाठी डॉक्टरांकडे गर्दी करणार. गर्दीत गेल्याने लहान मुलांना करोना होणार आणि भविष्यवाणी सत्य होणार…
ह्याला इंग्रजीत self-fulfilling prophecy असे म्हणतात. भविष्यवाणी केल्याने सत्य होणारी भविष्यवाणी.
A self-fulfilling prophecy is the sociopsychological phenomenon of someone “predicting” or expecting something, and this “prediction” or expectation coming true simply because the person believes it will and the person’s resulting behaviors align to fulfill the belief.
लहान मुलांवर तिसरी लाट येणार ह्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. असे कुठे परदेशात येऊन गेलेल्या लाटांमध्ये सुध्दा आढळले नाही. अशा अफवा पसरवून काही कंपनीने लुटमार करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे
फार्मा सेक्टरला भस्म्या झाला आहे. लोक अडचणीत सापडले कि वाट्टेल तेवढे पैसे कुठूनही आणून भरतात. हे त्यांना कळले आहे. आता त्यांना ह्याची चटक लागली आहे. मार्केटची मानसिकता तयार करण्याचे काम सुरु आहे असे मला वाटते आहे. पालकांनी ह्या प्रेशर tactic ला बळी पडून विनाकारण मुलांचे जीव धोक्यात घालू नये. लहान मुलांमध्ये ए2 रिसेपटर ची संख्या वयस्कर माणसापेक्षा कमी असते. शिवाय मुलांमध्ये रोगप्रतिकारक्षमता अधिक चांगली असते. आणि त्यांना मोठ्यांसारखे आजारही नसतात. त्यामुळे त्यांना करोना झाला तरी बरे होण्याचे प्रमाण मोठ्यांपेक्षा अधिक चांगले आहे.
घाबरून जाऊन कुठलाही आततायीपणा करणे टाळावे. इथे आपले लचके तोडायला लांडगे टपून बसलेले आहेत.