मेडशिंगी येथील कोविड सेंटरला आंबेडकर संस्थेच्या वतीने पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप
डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांचे वतीने आणि प्रथम संस्था व पिरॅमल यांच्या सहकार्याने मेडशिंगी येथील कोविड सेंटर साठी पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, जि. प. सदस्य अतुल पवार, जि. प. सदस्य अॅड. सचिन देशमुख, कोविड सनियंत्र अधिकारी डॉ. संदीप देवकते, आरोग्य अधिकारी बोराडे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, संभाजी ब्रिगेड चे अरविंद केदार, संस्थेचे नंदू मोरे, शर्मिला केदार, सुरेश काका चौगुले, चंद्रकांत शिंदे, संजय केदार आदी उपस्थित होते.
सध्या कोविड मुळे परस्थिती गंभीर असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन आवश्यकता भासत संस्थेने उपलब्ध केलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनमुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना कोविड सेंटर च्या माध्यमातून ऑक्सिजन ची सोय होणार आहे. संस्थेने या अगोदरही काही ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दिले असून इतर हि मदतकार्य संस्था करत असून संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे नंदू मोरे यांनी सांगितले संस्था कोरोना विषाणूच्या उद्रेकापासून सातत्याने मदतकार्य करत आहे. सांगली कोल्हापूर, सोलापूर आणि मुंबई याठिकाणी आपत्ती काळात संस्थेने धान्य, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर तसेच कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजू लोकांना शिजवलेले अन्न, समाजामध्ये कोरोना आणि त्यापासून संरक्षणाविषयी जाणीव जागृती, लसीकरण याविषयी जागृती, आशासेविका आणि इतर कर्मचारी यांना स्वच्छता साहित्य वाटप अशी कामे संस्था सातत्याने करत आहे. सध्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तुटवडा जाणवत असून ग्रामीण भागातून अन्य ठिकाणी उपचारासाठी जाणे अनेक कुटुंबाना शक्य नाही. रुग्णांना या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर च्या माध्यमातून तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन मिळणार आहे.यावेळी बापू ठोकळे यांनी सांगितले कि, पुरोगामी विचाराने काम करत असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी संस्था विकासात्मक आणि आपत्ती काळात मदत कार्य करत आहे. संस्था करत असलेल्या कामामुळे समाजातील अनेक घटकांना विविध पद्धतीची मदत होत असून संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी सांगोला तालुका कोविड सनियंत्रण अधिकारी डॉ. संदीप देवकाते यांनी उपस्थितांचे आणि संस्थेचे आभार मानले तसेच त्यांनी सांगितले कि शासन आणि सामाजिक संस्था एकत्र काम करत असल्याने कोविड नियंत्रणात आणण्यास सहजता येर्त आहे. यापुढे हि शासन आणि संस्था एकत्र काम करून कोरोनावर मात करता येईल.