जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रयत्नामुळेच उन्हाळी धान खरेदी केंद्रांची शुभारंभ
🔹 जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी केलेलं पाठपुराव्याला आलंय यश.
🔹रस्त्यावर उतरण्याचाही दिला होता इशारा
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 9 जून 2021:-
गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांची धान खरेदी आदिवासी विविध सहकारी सोसायट्या मार्फत करण्यात यावी म्हणून आविसं नेते व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केलेलं पाठपुराव्याला व प्रयत्नाला यश आले असून सगळीकडे धान खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आले. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान उत्पादन करून दोन महिने उलटल्यानंतर हि खरेदी केंद्रांतर्गत उन्हाळी धान खरेदी करण्यात येत नव्हता.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेलं होता.अनेक शेतकऱ्यांनी आपली समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे मांडले. शेतकऱ्यांची ही समस्या तात्काळ सुटावं म्हणून त्यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्र पाठवून उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या व आपबीती उल्लेख करीत धान खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केले होते.तदनंतर अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी चर्चा करून जर लवकर यावर तोडगा न निघाल्यास धान उत्पादक शेतकरी व आविस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोविड नियमांचे पालन करीत रस्त्यावर उतरण्याचे धमकीवजा इशारा ही त्यांनी दिले होते.सरकार व महामंडळाने याची दखल घेत शेतकऱ्यांचे उन्हाळी धान खरेदीसाठी सगळीकडे धान खरेदी केंद्रांची शुभारंभ करण्यात आली.
आविस नेते व जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः पाठपुरावा करून व अथक प्रयत्न करून शेतकऱ्यांची सोसायट्यामार्फत धान खरेदी करण्यासाठी सरकार,महामंडळ व आदिवासी विविध सहकरी संस्थाना भाग पाडल्याबद्दल धान उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रती समाधान व्यक्त करीत आहे.