राज-उद्धव एकीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू
🔹शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य
🔹 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला टोला
🔹राज-उद्धव युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई: विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि
9 जून 2021:-
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू राजकारणात एकत्र येणार का ❓ यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य त्यासाठी निमित्त ठरलं आहे. राज यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता यावर खोचक भाष्य केलं आहे.
उद्धव-राज एकत्र येणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर आकाशाकडे बोट दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं राज यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच भाष्य करू शकतील, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं.
खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारण्यात आले . तेव्हा त्यांनी राज ठाकरे यांना टोला हाणला. ‘परमेश्वर हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मेंबर नसतो. परमेश्वराचा कुठलाही राजकीय पक्ष नाही, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो, त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी एक प्रकारे राज यांना स्वत:हून पुढाकार घेण्यास सुचवल्याचं बोललं जाव त्यासाठी आपनं सुरू केली आहे. मनसेची मदत घेण्याचेही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या मदतीनं मराठी मते खेचून शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्लान आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला अधिक महत्त्व आहे.