भारतात सापडला कोरोना विषाणूचा अजुन एक खतरनाक व्हेरिएंट
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 9 जून. 2021:-
गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू सातत्याने आपले रूप बदलून अधिकाधिक धोकादायक होत चालला आहे. या विषाणूने नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. भारतात कोरोना विषाणूच्या एका व्हेरिएंटने आधीच धुमाकूळ घातला असताना आता देशात या विषाणूचा अजून एक व्हेरिएंट सापडला आहे. आता या व्हेरिएंटबाबत अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात सापडलेला हा दुसरा व्हेरिएंट खूप धोकादायक आहे.या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास सात दिवसांच्या आत रुग्णाचे वजन कमी होऊ शकते. यापूर्वी हा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये सापडला होता. तेथून हा व्हेरिएंट भारतात आल्याच्या माहितीस दुजोरा दिला गेला होता. मात्र आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्राझीलमधून कोरोना विषाणूचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. त्यातील दुसऱ्या व्हेरिएंटचे नाव बी.१.१.२८.२ असे आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार तज्ज्ञांनी या व्हेरिएंटची चाचणी एका उंदरावर केली. त्याचे परिणाम धक्कादायक होते. तज्ज्ञांना या संशोधनामधून दिसून आले की, संसर्ग झाल्यानंतर सात दिवसांच्या आत याची ओळख पटवता येऊ शकते. हा व्हेरिएंट एवढा धोकादायक आहे की, तो रुग्णाच्या शरीराचे वजन ७ दिवसांमध्ये कमी करू शकतो. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणेच हा विषाणूसुद्धा अँटीबॉडी कमी करू शकतो. पुण्यातील नॅशन इन्स्टीट्युट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या तज्ज्ञांनी सांगितले की, बी.१.१.२८२ व्हेरिएंट परदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये मिळाला होता. या व्हेरिएंटची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली आहे. तसेच त्याचे परीक्षण करण्यात आले आहे. सध्या भारतात याचे अधिक रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक सापडला आहे परदेशातून आलेल्या दोन जणांची सॅम्पल सिक्वेंसिंग करण्यात आली होती. कोरोनामधून रिकव्हर होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणे दिसून येत नव्हती. मात्र याची सॅम्पल सिक्वेंसिंग केल्यानंतर जेव्हा बी.१.१.२८.२ व्हेरिएंटी माहिती मिळाली तेव्हा त्याची नऊ सिरीयन हेमस्टर उंदरांवर चाचणी घेण्यात आली. यामधील तीन उंदरांचा मृत्यू हा शरीरातील अंतर्गत भागात संसर्ग वाढल्याने झाला