कोरोनाच्या नियमांचे ऊलंघन करून भाजप नेत्याचा थेट लसीकरण केंद्रात वाढदिवस साजरा; गुन्हा दाखल करण्याची मागणी.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 9 जून. 2021
एखाद्या लसीकरण केंद्रमध्ये कोरोना संबंधी सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कामकाज चालू असते. तेथे दोन व्यक्तींच्या मध्ये साधारण पणे दोन मीटरचे अंतर ठेवणे अपेक्षित असते. मात्र एका भाजपच्या महिला नेत्याने अक्षरशः लसीकरण केंद्रामध्येच आपला वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे.
मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये ही घटना घडली आहे. यावेळी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मिळून लसीकरण केंद्रावर आपल्या महिला नेत्याचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा केला आहे. यावेळी सर्वांनी केक आणून तो माधुरी जायसवाल या भाजपा महिला नेत्याच्या हस्ते कापला. यावेळी भाजपचे अनेक कार्यकरते उपस्थितीत झाले होते.
सर्वांनी भाजपच्या या महिला नेत्या माधुरी जायसवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पूर्णतः उल्लंघन करण्यात आले होते. लसीकरण केंद्रावर झालेल्या या वाढदिवस कार्यक्रमाची माहिती एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बाहेर पडली आहे.
आसपासच्या परिसरात या संदर्भात चांगलीच चर्चा रंगली होती. व्हिडिओ बाहेर व्हायरल झाल्यानंतर ताबडतोब बीजेपीची महिला नेता, माधुरी जायस्वाल हिने सर्वांची माफी मागितली आहे. माधुरी जयस्वाल हिने सांगितले की, माझ्या कार्यकर्त्यानी माझा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा केला आहे. मात्र हा वाढदिवस लसीकरणाच्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे मी आपल्या सर्वांची माफी मागत आहे. असे सांगितले.
देशातील भाजपचे सरकार कोरोना महामारीच्या बाबतीत निष्काळजी असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढलेले आहेत, त्याच बरोबर त्यांचे सर्व कार्यकर्तेही कोरोनाच्या विषाणूपासून निष्काळजी राहत आहेत. पण त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या प्राणास मुकावे लागेल, याची फिकीर मात्र केंद्र सरकारला व त्यांच्या कार्यकर्त्यांना अजिबात नाही. याचे हे उत्तम उदाहरण होय.