संस्थांनी अवाजवी शुल्क घेऊ नये – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शिक्षकांना सरकारने विषाच्या बाटल्या द्याव्यात– डॉ.कुमार लोंढे (अध्यक्ष सेन्ट्रल ह्यूमन राईट संघटन)
मुंबई प्रतिनिधी/प्रवीण कडूस्कर
महाराष्ट्र शासन निर्णय, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ द्वारे मुंबई,पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबाद या विभागांत विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शाळांनी अवाजवी फी वाढ केली आहे, अशा शाळांच्या निर्णयाविरूद्ध पालकांना अपिल करता येईल.
यात निवृत्त जिल्हा न्यायाधीश,सनदी लेखापाल यांचा समावेश असेल.संस्थांमधील आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती उपयुक्त ठरेल. उर्वरित विभागांसाठी समिती लवकरच जाहीर केली येईल. निवड समितीच्या शिफारसीनुसार आम्ही राज्यस्तरीय पुनर्रिक्षण समितीचे बळकटीकरण केले आहे.
या महामारीच्या काळात बहुतांश संस्थांनी उदात्त काम केलंय, पण तरीही काही संस्था पालकांकडून अधिक शुल्क घेत असल्याच्या तक्रारी पालक आणि पालकांच्या शिष्टमंडळाकडून प्राप्त होत आहेत.
ह्या कोरोना संकट काळात सर्वच आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. संस्थांनी अवाजवी शुल्क आकारणे बंद करावे, असे पुन्हा एकदा आवाहन करते. गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांविरोधात कडक कारवाई केली जाईल.
असा निर्णय घेतल्याने शिक्षण संस्थाचालक व शिक्षक या घटकांना कोरोना काळात उपासमारीने मरावे लागणार आहे कारण दोन वर्षे झाले शाळा पूर्णपणे बंद आहेत मात्र शासन दहावी ,बारावी परीक्षा शुल्क,विलंब,अतिविलंब फी आकारून मोकळे झाले आहे .
या निमित्ताने अवाजवी फी घेण्याला आमची ही संमती असण्याचे कारण नाही परंतु नियमित व रास्त फी घेण्यास शासन आडकाठी नसावी.
ज्यांच्या शाळा भाड्याच्या जाग्यात आहेत? ज्यांनी कर्ज काढून स्कूल बस घेतल्या आहेत? कर्ज काढुन शाळा बांधल्या आहेत? अंतर्गत सुविधा साठी लाखो रु खर्च केले आहेत? अधिकाऱ्यांना पैसे मोजले आहेत? मान्यतेसाठी पैसे मोजले आहेत? बाबूशाहीची उठाठेव करण्यासाठी पैसे घामाचे दिले आहेत? यास जबाबदार कोण? शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातील शकुनी मामा व रक्तपिपासू वृत्ती यास जबाबदार आहे तेव्हा राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी आमच्यावर उपासमारीची वेळ येण्यापेक्षा विषाच्या बाटल्या राज्य सरकारने कोरोना काळात मोफत वाटाव्यात असे मत सेंट्रल ह्यूमन राईट संघटन चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांनी मानले आहे.
या संदर्भात लवकरच शिक्षणमंत्री यांची भेट घेणार आहे.जे शिक्षक ,संस्थाचालक या शिक्षणातील अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवण्यास इच्छुक असतील त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावा व लढा मजबूत करावा असे आवाहन करण्यात येत आहे
संपर्क- डॉ.कुमार लोंढे 9881643650/7020400150
Email; snpprashala777@gmail.com