जनविद्रोही टीम
ब्रेकिंग न्यूज सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग 17 होरपळून मृत्यू
अत्यंत विदारक व दुर्दैवी घटना पुण्याच्या पिरंगुट भागात घडली.MIDC परीसरात एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीतील आज संध्याकाळी 5 वाजेदरम्यान भीषण आग लागली. या कारखान्यात अनेक जण अडकले असताना १५ महिला आणि २ पुरुष मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.
या ठिकाणी आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायझर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनास्थळी प्रशासकीय यंत्रणा तात्काळ हजर झाली.
अचानक लागलेल्या आगीमुळे ३७ मजूर अडकून पडले होते. त्यापैकी सर्व १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत या आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले असून सदर
पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत
याबत आगीचे नेमके कारण अजुन समजू शकले नाही