आज दिनांक ७ रोजी दुपारी ३.०० वाजता पुणे सोलापूर हायवे वर इंदापूर शहराजवळील पायल हॉटेल नजदीक चार चाकी दोन वाहनांमध्ये जोरदार अपघात होऊन त्यातील ४ जण जागीच ठार झाले आहेत.
इंदापूर शहराजवळ पुणे सोलापूर हायवे वर असणाऱ्या पायल हॉटेल नजदीक ईरटीका (MH- 46 BE- 4515) ही मोटार पुण्याकडे जात असताना अचानक टायर फुटल्याने डिव्हायडर तोडून आऊट साईडच्या दिशेने येऊन सोलापूर कडे जाणाऱ्या बुलेरो (MH -13 AZ- 3901) या गाडीला जोरदार धडकली. या अपघातात बुलेरो गाडी मधील 3 जण व ईरटीका मधील १ जण जागीच ठार झाले आहेत. यातील तीन जण पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या गावचे रहिवासी असून त्यातील गोविंद पोपटराव गोडसे, अविनाश पवार, साळुंखे अशी नावे समजली जात आहेत.तसेच ईरटीका गाडी मधील १ जण (नाव माहित नाही) हे असून या अपघातातील मृत व्यक्तींना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Source Indapur Daily news)