मुंबई/भांडुप
आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान या संस्थेने लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना मानसिक दृष्ट्या समाधानी व निरोगी राहण्यासाठी संवाद साधला. आर्थिक परिस्थिती, शाळा बंद, काॅलेज बंद यामुळे कंटाळलेल्या, वैतागलेले युवाशक्ती सोबत संवाद साधून नैराश्य येणार नाही याची खबरदारी घेतली. लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि स्पर्धा युगात पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध होईल असा विचार मनात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल.
तसेच रस्त्याकडेच्या लोकांना फुटपाथ रहिवाशांना अन्नपुर्णा व फुड ड्रायव्हर यांच्या सहकार्याने नियमित शनिवारी व रविवारी अन्न वाटप करण्यात येत आहे. अन्न वाटप कार्यक्रम दरम्यान आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विद्या सरमळकर यांच्या लक्षात आले की, या रस्त्याकडेच्या फुटपाथ वरील रहिवाशांना कपड्यांची सुध्दा गरज आहे. तसे त्यांनी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कपडे जमा करण्याचे आवाहन केले, विद्या सरमळकर व संगीता मर्गज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकानेकांनी कपडे वा खेळणी जमवले. त्याचे वाटप विक्रोळी व पवई, कांजुरमार्ग ते भांडुप या भागात करण्यात आले.