मंगळ ग्रहावरील जग कधी बघितलं आहे का?
हे सर्व सुंदर फोटोज नक्की पहा. नासाच्या पर्सिविअरन्स नावाच्या रोव्हरने असे अनेक फोटो टिपून पृथ्वीवर पाठवले. हे फोटोज गेल्या शंभर दिवसांत काढलेले आहेत. कोणतंही इंस्टा फिल्टर नाही, की कोणतं फोटोशॉप एडिटिंग नाही.. तरी या ओरिजिनल फोटोजमध्ये मंगळ ग्रह अतिशय सुंदर दिसतोय.
मंगळावर जीवसृष्टी ह्याआधी कधी होती का?, इथला भूगोल काय?, खनिजे कोणती? अश्या गोष्टींचा अभ्यास करायला हे रोव्हर मंगळावर शोध घेत फिरत आहे. इतिहासात पहिल्यांदाच मंगळावर हेलिकॉप्टर देखील उडवण्यात आले आहे. त्याचं नाव इंजेन्युइटी असं आहे. तेसुद्धा मंगळ ग्रहाचे फोटोज पाठवत आहे.
मंगळ ग्रहावरील हे सुंदर फोटोज पाहून एखादी गोष्ट ‘मंगळी’ शुभ/अशुभ मानायचे विचार सोडून देऊ शकतो. कारण, विद्यानाच्या वाटेवर अजून एक पाऊल पुढे आलो आहोत !
माहिती संकलन: टीम अजिंठा
फोटोज : NASA/ JPL- Caltech