एल्गार आंदोलकांना तुरुंगवास,?
पीकविमा लढाई उच्च न्यायालयात
शेतकरी पुत्रांनी नक्षलवादी होऊन सत्ताधाऱ्यांना गोळ्या घालायचे का. ❓
विजय पोहनकर यांनी व्यक्त केले रोखठोक विचार.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 6 जून 2021:-
खरीप हंगाम 2020 सतत च्या पावसाने नेस्तनाबूत झाला, पिके मातीमोल झाली.शेतकऱ्यांच्या घरात काय तोंडात अन्ना चा दाणा पडला नाही. ह्याचे या देशात कुणाला काही देणे घेणे नाही का?जगाचा पोशिंदा ही फुशारकी पालुपद लावून, “बळीराजा ” म्हणून शेतकऱ्यांना गुलामीत, आर्थिक खाईत ढकलत त्याचे रक्त पिण्याचे काम शासन/प्रशासन व्यवस्था करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम व शेवट पर्यंत एल्गार संघटना जळगांव (जामोद)जिल्हा बुलढाणा हीच पिकविम्या बाबद अखंडित लढा उभा करून लढत आहे, न्याय मिळेपर्यंत लढत राहील. तहसील पासून सुरू केलेला निवेदानाचा प्रवास (शेतकरी खुट मोर्चा) ते मंत्रालयापर्यंत येउन सुद्धा संविधानिक मार्गाने न्याय मिळत नसेल. तर, शेतकरी पुत्रांनी नक्षलवादी मार्ग स्वीकारून सत्ताधार्यांना गोळ्या घालायच्या का? निवेदना नुसार 31 मे. 2021 ला एल्गार संघटना मंत्रालया जवळील महात्मा गांधी पुतळ्या समोर आमरण उपोषणाला पोहचली असता,पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र व कोरोना कालखंड म्ह्णून संविधानिक मार्गाने आंदोलन करू न देता उपोषण कर्ते प्रसेनजीत दादा पाटील , विजय पोहनकर ह्यांच्या सह त्यांना समर्थन देण्यासाठी कोरोना काळात शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या करिता स्वतःचा जीव धोक्यात घालत मुंबईत पोहचले.त्यात आशिष वायझोडे, सतीश तायडे इरफान खान,मुझिर (मौलाना) खान,तुकाराम गटमणे,भागवत अवचार, अझहर देशमुख ह्या सर्वांवर मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात ठाणेदार विश्वनाथ कोळेकर ह्यांनी गुन्हा क्र.242/2021 कलम 143,149,188,269 व 51(ब) ही गुन्हे लावून दिवसभर तुरुंगात डांबले.,पोलीस प्रशासनाने त्यांचे काम केले. मात्र,ठाणेदारांनी माणुसकी दाखवीत शेतकरी लोकांसाठी असलेले हे आंदोलनकर्ते आहेत ह्याचा विचार करता 68,69 कलम लावून काम झालं असतं. पण,पोलिसी रुबाब साहेबांनी दाखविला, .वेळ प्रत्येकाला संधी देत असते हे विसरून चालणार नाही.!
पीकविमा हा विषय भयंकर आहे, 5 हजार कोटी रुपयांचा मलिदा हा शेतकरी बापाच्या घामातून भरलेला प्रीमियम असून हा मलिदा गळप करण्यासाठी पीकविमा कंपन्यांना कोण पदरात लपवित आहे, हे आता उच्च न्यायालयात पाहायला मिळणार आहे. एल्गार संघटना पीकविमा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ह्याना न्यायालयात नागडी करू.आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या संविधानिक मार्गाचे पाईक आहोत.शेतकऱ्यांचे पैसे खाणारे हरामखोर औलाद नाही.वाचक मित्रांनो! आम्ही तुम्हाला नेहमी बोलत आलो खाजगीकरण हे भांडवली नफेखोरीच आहे.त्यांना दिसतो फक्त नफा.पैसा.आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी शेतकरी बापाकडे बघून सरकारी विमा कंपनी ला हा ठेका देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे भांडवलदार मित्र हे शेतकऱ्यांनाचा जीव घेतल्या शिवाय राहणार नाहीत.गंमत म्हणजे राज्यसरकार सुद्धा ह्या कंपन्यांना कडक आदेश का देत नाही? हा सुद्धा प्रश्न आहे.5हजार कोटीत राज्यसरकार सुद्धा हिस्सेदार आहे का? हेही तपासावे लागेल. पीकविमा ही लढाई अविरतपणे सुरू राहील. तुरुंगवासाची चिंता नाही.जर काल नवतरुण मुलं सोबत नसती तर आम्ही जमानतवर बाहेर आलोच नसतो.जमानत घेतलीच नसती.आम्ही स्वतः ठाणेदारांना आम्हाला कोर्टात हजर करा ही विनवणी केली.मात्र,त्यांनी तसे का केले नाही ?? .हे गुपित आम्ही समजू शकतो. घरात बसून मरण्यापेक्षा लढाईत मरणारे विरपुत्र म्हणून इतिहासात नोंदीत होतात. आपण राजमाता जिजाऊ चे लेक आहोत.लढाई ही आपल्या रक्तात भिनभिनली आहे.राजकीय झेंड्यात न अडकता शेतकरी, शेती ह्यावरच एकत्रित येऊन लढा उभा केल्यास अनेक कठीण प्रश्न सहज सुटतील
असे प्रतिपादन विजय विमल सहादेवराव पोहनकर यांनी केले आहे.