तिन लाख साठ हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त.
चंद्रपूर जिल्ह्यातील घटना.
चंद्रपूर पोलीसांनी केली कारवाई.
चंद्रपूर :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 6 जून 2021:-
६ जून रोजी मा.अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गोपिनीय माहितीवरून पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोलीस पथकाने शास्त्रीनगर भद्रावती येथे छापा टाकला. आरोपी प्रविण कटारे,सुरज आगरे,मनोज कटारे यांच्या घरातील वालकंपाऊड जवळ पोलीस पथकास अवैध देशी दारूचा साठा मिळाला. त्यामध्ये ३,६०,००० रु. किंमतीचा ३६ बाक्स देशी दारूचा साठा तसेच ४ मोबाईल फोन किंमत ३१,००० रू. असा एकुण ३,९१,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचा माल आणी नमुद ३ आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन भद्रावती येथे अप.क्र. १९६/२०२१ कलम ६५ (ई),८३ म.दा.का. सहकलम १८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मा.अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर अतुल कुलकर्णी आणी उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुनिलसिंग पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोउपनि. अमोल तुळजेवार यांनी केली.