मुंबई : दि ७ पासून म्हणजे सोमवारपासून राज्यांतर्गत ई-पासची प्रवासाकरिता गरज लागणार नाही. अनलॉकच्या नव्या नियमानुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असणार आहे. प्रवास करत असताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात थांबा असल्यास तर मात्र ई-पास बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे.राज्यातील कुठलेही शहर अथवा जिल्हा यांचा समावेश पाचव्या गटात नाही.
जिल्हा बदली प्रवासासाठी ई-पासची गरज भासणार नाही हे स्पष्ट आहे.
शासनाने राज्यात “ब्रेक दि चेन’अंतर्गत” निर्बंध कठोर करण्यात आले होते आणि प्रवासावरील अधिक कडक नियम करण्यात आले होते . याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हा प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पास बंधनकारक होते.
असे जरी असले तरी स्थानिक प्रशासनाचा निर्णयही याबाबत महत्वाचा असणार आहे. याबाबत पुढच्या शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला जाईल व त्यानंतर स्थानिक प्रशासन नुसार आपला जिल्हा कुठल्या गटात समाविष्ट होतो ते जाहीर त्यानुसार तिथे निर्बंध लागू होतील त्यामुळे लोकांना आता ई पास पासून सुटका मिळाली आहे