सुरेश गणपत कांबळे खून प्रकरणात आम्ही संपूर्ण ताकतीने कुटुंबाच्या पाठीशी….. वैभव गिते,
आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार…पंकज काटे,सोलापूर जिल्हाध्यक्ष
सुरेश उर्फ सूर्यकांत गणपत कांबळे या बौद्ध समाजातील तरुणाचा गारवाडपाटी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे आहिल्या हॉटेल मध्ये गळा आवळून खून करून त्याचे प्रेत दोरीने बांधून कॅनॉल मध्ये टाकले होते.हे प्रेत पंढरपूर तालुक्यातील शेगाव मायनर फाटा कॅनॉल नळामध्ये जैनवाडी शिवारात प्रेत सापडले.प्रेताचे पोस्टमार्टेम करून मयताचा व्हिसेरा,व डी.एन.ए प्रोफाइल सॅम्पल करीत राखून ठेवले असून ते सोलापूर व पुणे सी.ए. तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिनांक24 फेब्रुवारी 2021 रोजी सुखदेव प्रकाश गोदे पोलिस उपनिरीक्षक यांनी सरकार पक्षाच्या वतीने भादवी 302,201नुसार फिर्याद दाखल केली.पंढरपूर पोलिसांनी अज्ञात मयताचा अधिक तपास केला असता माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये मानव मिसिंग नं.09/2021 मधील खबर देणार संजय सिद्राम चंदनशिवे रा.कमलापूर ता.सांगोला जि.सोलापूर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मयताच्या अंगावरील कपडे,कमरेचा बेल्ट,ओळखून सदरचे प्रेत हे त्यांचा मेहुणा सुरेश गणपत कांबळे रा.पिंपळे गुरव ता.हवेली जि.पुणे याचे असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले.पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून गारवाड पाटी अहिल्या हॉटेल येथील भाऊ मामा हुलगे,मामा भानुदास हुलगे,हनुमंत निवृत्ती गोरड या आरोपींना अटक केली.पंढरपूर पोलिसांना माळशिरस पोलिसांची सुरेख साथ मिळाली.सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.मयत सुरेश उर्फ सूर्यकांत गणपत कांबळे हे अहिल्या हॉटेल गारवड येथे स्वयंपाकी (कुक) म्हणून कामाला होते.गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधीकारी पंढरपूर हे गुणवत्तेवर आधारित तपास करीत आहेत.गुन्हा फेब्रुवारी महिन्यात घडला असून आरोपींचा तपास मे महिन्यात लागला आहे.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटना आक्रमक झाली असून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सोलापूर यांना भेटणार असल्याची माहिती राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे जिल्हा अध्यक्ष पंकज काटे यांनी दिली आहे.