सांगली जिल्ह्यात वृक्षारोपण करण्याचा बार्टीचा उपक्रम कौतुकास्पद – युवा नेते संदेश भंडारे
खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन एक लाख रोपटी देणार
तासगाव प्रतिनिधी – डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था बार्टी ने वृक्षारोपण करण्याचा व शासनाच्या विविध योजना तळागाळात राबवण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून सांगली जिल्ह्यात यंदा खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशन तर्फे एक लाख रोपटी लावून वृक्षारोपण करण्यात येणार असे मत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य तथा फाऊंडेशन चे अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी व्यक्त केले. बार्टी च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, याप्रसंगी बार्टीच्या समतादूत सविता पाटील, नागाव कवठेच्या सरपंच रिजवाना मुलाणी, माजी सरपंच विध्यमान ग्रा प सदस्य महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, पोलीस पाटील वैभव पाटील, युवक नेते विशाल चंदूरकर, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेशभाऊ भंडारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,
स्वागत प्रास्ताविक समतादूत सविता पाटील यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचे हस्ते झाडे लावण्यात आली. येत्या महिन्याभरात बार्टीच्या वतीने तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती समतादूत सविता वाले यांनी दिली. आभार माजी सरपंच महेशकुमार पाटील यांनी मानले.