“राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग या अनुषंगाने शासनाच्या अधिकृत नियमावली नुसार सोमवार, ७ जूनपासून
अन लॉक बाबतचा नियम लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा.सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.”
—-मुख्य सचिव सीताराम कुंटे
🌱ऑक्सिजन बेड व पॉजिटिव्ह दर या नुसार जिल्हा प्रशासन स्वतंत्र आदेश करणार
आठवढ्यात आलेले पेशंट ऑक्सिजन बेडचे प्रमाण, पॉझिटिव्हीटी दर या नुसार प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल अथवा कडक केले जाणार आहेत. याबाबत एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
🌱ना.विजय वडेट्टीवार यांची फुसकी घोषणा
या अगोदर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने थोड्या वेळात खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट सांगितले आहे . त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला व महाविकास आघाडीवर टीका ही झाली त्याबद्दल मंत्री महोदय यांनी स्पष्टीकरण ही दिले.
🌱या विभागाना स्वतंत्र आदेश काढण्याची मुभा
महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ग्रामीण- मुंबई वगळता हे नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील याबाबत
मुंबई, ठाणे, सोलापूर,पुणे,वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पिंपरी चिंचवड, , नागपूर आणि औरंगाबाद महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील व या विभागात स्वतंत्र आदेश काढण्याचे अधिकार त्यांना आहेत.
🌱 कशी आहे शिथिलतेबाबत विभागणी व पाच स्तर
5 टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येणार आहेत. हा पहिला स्तर आहे.5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडनार आहे.5 ते ते 10 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील तो तिसरा स्तर असेल . त्या ठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होनार आहेत.
10 ते 20 टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असनार तो चौथा स्तर असेल. तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असणार आहेत. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल व ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील तो पाचवा स्तर असेल असे पाच टप्यात विभागणी करून शिथिलतेबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
🌱 काय सुरू राहणार? काय बंद पाच टप्यात!
पहिल्या स्तर या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसनार आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मॉल व सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट बंधनकारक राहील. तिसऱ्या स्तराच्या बाबत दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहनार आहेत व सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहनार चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू असतील व अन्य दुकाने बंद राहनार आहेत. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार आहेत तर शनिवार आणि रविवारी ती बंद असतील
असे आदेश व नियमावली राज्यशासन ने जाहीर केली असून त्याबाबत अंमलबजावणी सुरू होईल