लसीकरणासाठी 35 हजार कोटी खर्च झाले कुठे❓प्रियंका गांधी चा केंद्र सरकारला रोखठोक सवाल.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 जून. 2021
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना विरोधी लसीकरणा साठीचा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला गेला? असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका वारंवार कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारला रोखठोक प्रश्न विचारत आहेत.
“मे महिन्यात लस उत्पादन क्षमता ८.५ कोटी. एकूण उत्पादन झालं ७.९४ कोटी आणि लस देण्यात आल्या ६.१ कोटी, सरकारचा दावा आहे. जून मध्ये 18 कोटी डोस येणार आहेत… असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.