कोरोना ने माणूस माणसापासून दुरावत असताना माणुसकी अजून जिवंत आहे याचे उदाहरण म्हणजे जगण्यास बळ देणारी लेडी सिंघम सुन आज सोशल मीडियावर न वन ठरत आहे तिने आपल्या वृद्ध कोरोना बाधित सासऱ्यांना पाठीवर बसून थेट रुग्णालय दाखल केले.ही सून अभिनंदनास पात्र ठरत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की निहारीका असे या लेडी सिंघम सुनेचे नाव आहे. सासऱ्याचे नाव थुलेश्वर दास असे असून दास हे 75 वर्षांचे आहेत तर निहारीका याचे पती सुरज हे कामानिमित्त घरापासून दूर असतात. पतीच्या गैरहजेरीत निहारीका याच आपल्या सासऱ्यांची काळजी घेत असतात. भाटीगावच्या राहा येथील रहिवासी असून त्यांच्या धाडसाचे कोतूक होत आहे.
सासऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच निहारीका या लेडी सिंघम यांनी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता चक्क आपल्या पाठीवर बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालय मध्ये दाखल केले. निहारीक हीला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
रुग्णालयात स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगून निहारीका यांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. परन्तु सासऱ्यांना एकट ठेवण्यास तिने नकार दिला त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून त्या दोघांनाही रुग्णवाहिकेने नागाव भोगेश्वरी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली.
तिच्या या धाडसाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अशी सून सर्वाना मिळावी अशी भावना व्यक्त आहे.