भाजपचे आमदार देवराव होळीच्या नेतृत्वातील आक्रोश आंदोलनाने केली कोरोना नियमांची पायमल्ली.??
@ पोलीस स्टेशन पासून अंदाजे शंभर मीटर असेल आंदोलन स्थळ.
@ गृहमंत्रालयाच्या 30 जून पर्यंतच्या आदेशाची पायमल्ली.?
@ आम. होळी सह सहकाऱ्यांवर कारवाई होणार ❓
@ राज्यातील रेडझोन जिल्ह्याचा आम. होळींना पडला का विसर?
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 3 जुन . 2021 :-
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जून नंतर शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून तेथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यातील रेड झोन मध्ये बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारही करण्यात आला आहे. देशात कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम राहणार, असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना पत्र पाठवले आहे.
ज्या जिल्ह्यात अधिक कोरोनाबाधित आहेत, त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयायोजना सूनिश्चित करण्यात याव्यात, कठोरपणे निर्बंध लागू केल्यामुळे दक्षिण आणि ईशान्यच्या काही भागांना सोडून संपूर्ण भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार होत असल्याने खबरदारी म्हणून कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. असे असूनही गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे आमदार डॉ. होळी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील इंदिरा गांधी चौकात आज दि. 3 जुन रोजी ओबीसी समाज बांधवांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि समस्यांना सोडविण्यासाठी फिजिकल डिस्टन्सचे नियम सरसकट तोडण्यात आले. गडचिरोली पोलीस स्टेशन पासून अगदी 100 मीटर अंतरावर हे आंदोलन करण्यात आले. आक्रोश आंदोलन सुरू असताना मात्र कोणत्याही प्रकारच्या कोरोना संदर्भातील नियमावली पाडण्यात आली नाही हेच महत्त्वाचे आहे. भाजप चे आंदोलन सुरू असताना इंदिरा गांधी चौकात असलेले पोलीस ही या आक्रोश आंदोलन रोखण्यासाठी पुढे येऊ शकले नाही. किंवा जवळच असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनाही माहिती देऊन आक्रोश आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न केले नाही.ही एक प्रकारचीं शोकांतिकाच म्हणावी लागेल.
कोरोना काळात पाच पेक्षा जास्त लोकांचा जनसमुदाय करण्यात येऊ नये. असे गृहमंत्रालयाने आदेश दिले असले तरी भाजपचे आमदार होळी यांनी हे आक्रोश आंदोलन केले….