सांगली/प्रतिनिधी
आरपीआयचे संदेशभाऊ भंडारे यांच्याकडून पाच लाखांचा निधी जमा
अद्यावत रुग्णवाहिकेसाठी केंद्रीय मंत्री डॉ.आठवले यांच्याकडून 12 लक्ष निधी मंजूर
– आरपीआयचे लोकसभा जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे हे नेेहमी सामाजिक व विधायक कामात अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे केंद्रीय आठवले साहेब यांचा त्यांच्यावरील विश्वास होय.आपल्या कामाच्या जोरावर व कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांनी
पाच लाखांचा निधी डॉ विवेकजी गुरव यांच्याकडे जमा केला .
कोरोनारुग्णांच्या सेवेसाठी 17 लक्ष रुपयांची अद्यावत रुग्णवाहिका केंद्रीय मंत्री डॉ. रामदासजी आठवले यांच्याकडून 12 लक्ष निधी उपलब्ध झाला असून उर्वरित पाच लाख रुपये संदेशभाऊ भंडारे यांनी दिला. आम्ही तासगावकर कोविड सेंटर च्या कार्याला मदत म्हणून ही रुग्णवाहिका सेवेत राहिल.