हॉस्पिटलमधील उपचारानंतर मिल्खा यांची तब्येत सुधारली आहे. मात्र निर्मल कौर यांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनमध्ये शनिवारी वाढ झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या विनंतीवरुन त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.
मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यांना रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मिल्खा सिंग याच्या घरच्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मला कोरोनाची लस घेण्याची गरज वाटत नव्हती. पण आता जाणीव झाली की ती घेतली पाहिजे, असं मिल्खा सिंग यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांचं वय 91 वर्ष आहे. मिल्खा सिंग यांनी 1960च्या रोम ऑलिंपिकमध्ये 400 मीटर फायनलमध्ये चौथं स्थान मिळवलं होतं. तर 1958 आणि 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.