अपघातातील मृत अधिपरिचारिका महिलेच्या परिवारातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी.
@ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नसेऀस संघटनेच्या वतीने मागणी
@ उपचारा दरम्यान मृत्यू.
@- सोनापूर फाट्याजवळ पोलीस वाहनाने झाला होता अपघात .
-@ कोरोना काळात खंबीरपणे करित होती ड्युटी.
शासन गंभीरतेने दखल घेऊन परिवारास आर्थिक मदत करणार??
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १ जून २०२१
गडचिरोली ते आष्टी मार्गावर पोलिस वाहनाने 26 मे रोजी दुचाकी वाहनाला धडक दिल्याने या अपघातात अधिपरिचारिका सुषमा दुर्गे ही महीला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते. परंतु पोलीस वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेवटी उपचारा दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुषमा या अधिपरिचारिका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे सोनापुर, आष्टी व सावली परिसरात फार शोककळा पसरली आहे.
गडचिरोलीवरून अहेरीकडे जाणारे अहेरी प्राणहिताच्या पोलिस वाहनाने सोनापूर येथील आरोग्य उपकेंद्रात अधिपरिचारिका पदावर कार्यरत असलेल्या सुषमा दुर्गे या कर्तव्यावर जात असतांना त्यांच्या दुचाकीला 26 मे रोजी सोनापूर फाट्याजवळ जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. प्रारंभी उपचारा नंतरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 27 मे च्या सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीसुद्धा सोनापूर फाट्याजवळ अनेकदा अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. असे असतांनाही येथे गतिरोधक उभारण्यात आलेले नाही. इथेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बेशरम पणा सिद्ध होत आहे.भविष्यात अपघात रोखण्यासाठी येथे गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे. ही अतिशय दु:खद घटना घडली असून यासाठी प्रशासकीय अधिकारी , पोलीस वाहन चालक, आणि बेजबाबदार,, बेशरम जनतेच्या समस्या कडे दुर्लक्ष करणारे राजकीय नेते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. हे नाकारता येणार नाही..
. दुर्गे परिवारास दु:खातून सावरण्यास शक्ती देवो अशी ग्राम पंचायत सोनापूर आणि ग्रामवासियां कडून एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. अनेक वर्षांपासून सोनापूर वासीय सर्वांचे आरोग्याची काळजी घेणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या, गावं विकासाला योगदान दिलेल्या, सोनापुर येथील कु. एस. के. दुर्गे (सिस्टर)CNM या गावातील एक कर्मचारी अशा एकाकी जाण्यानं संपूर्ण सोनापूर गावावर शोककळा पसरली आहे, त्यामुळे दिनांक 28/05/2021 ला शासकीय दुखवटा जाहीर करून सर्व गावातील कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. . ग्राम पंचायत सोनापूर अंतर्गत शासकीय आरोग्य विभागात कर्त्यव्य बजावताना मृत्यू झाल्यास सबंधित कर्मचारी यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान फंड, जिल्हा परिषद शेष फंड , तसेच पोलीस विभागाचे वतीने १० लाख रुपये मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी आणि नसेऀस संघटना यांनी केली . या बाबतचे निवेदन दिले. 31 मे रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी ,आम.होळी यांना देण्यात आले. निवेदन सादर करीत असताना संघटनेच्या निलुताई वानखेडे , सचिव ज्योती काबरे , शर्मिला जनबंधु , अपणाऀ पेशट्टिवार , भावना लाजुरकर , अमिता नागदेवते आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासन योग्य न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरणार आहेत का❓ असा प्रश्न सोनापूरवासीय जनतेने उपस्थित केला जात आहे. चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, सुपरिचित, सोनापूर वासीय जनतेच्या हाकेला प्रतिसाद देत आरोग्य सेवा दिली.सर्वांना समजून घेऊन तण-मनाने काम केले.
कु. सुषमा दुर्गे(पाटिल) CNM सिस्टर सोनापूर, यांच्या अशा अचानक जाण्याने, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे .गावाला दिलेली सेवा, योगदान, कायम स्मरणात राहील .त्यांच्या परिवारास, या दुःखातून सावरण्याचा धैर्य मिळो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केल्या.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा त्यांच्या दुःखात सहभागी आहे अश्या शब्दात आरोग्य विभागातील हजारो कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणतेही कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना योद्धा घोषित करण्यात यावा, तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचारी डॉक्टर , नर्स , तथा रुग्णालयातील सफाई कर्मचारी यांचे आरोग्य विभागाच्या वतीने पन्नास लाख रुपयांचा विमा कवच देण्यात यावे अशी मागणी नसेऀस संघटनेच्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि शासन किती गंभीरपणे असे प्रकरण निकाली लावते. याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.
मागणी रास्त आहे