मराठा साम्राज्यातील भटशाहिस आव्हान देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर
- Written By Dr.Kumar Londhe
स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा महिला विषय असणारा दृष्टिकोन शूद्र मानसिकता चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि प्रकांडपंडित यांचा धर्म व्यवस्थेवर असणारा पगडा या बाबी आपणास माहीत आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31मे 17 25 रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला मानकोजी व सुशिलाबाई शिंदे हे त्यांचे आई वडील होय . वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह विवाह सुभेदार मल्हारराव होळकर याचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या बरोबर झाला.
कर्तुत्वाच्या जोरावर कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून मराठ्यांच्या इतिहासात साम्राज्यात अहिल्या बाई होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांना दोन अपत्ये होती सासरे यांचा प्रचंड विश्वास त्यांच्यावर होता. पती खंडेराव यांचा कुंभेरीच्या लढाईत दुर्दैवी मृत्यू झाला पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा त्या काळी प्रचलित होती सासरे मल्हारराव होळकर म्हणाले प्रजाहित साठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे सासर्यांचा मान राखून सती न जाता त्यांनी राज्यकारभारावर लक्ष दिले. सतीची प्रथा नाकारून त्यांनी महिला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे महान असे अद्भुत कार्य केले.आपल्या कन्येचा विवाह करताना त्यांनी स्वयंवर घोषित केले चोर दरोडेखोर लुटारू याचा बंदोबस्त जो करील त्या शूर व्यक्तीस आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करून देऊ असं त्यांनी निश्चय केला. एवढेच नव्हे तर हा विचार त्यांनी प्रत्यक्षात साकारून प्रजेसमोर व व्यवस्थेसमोर एक आदर्श निर्माण केला ही जात व्यवस्थेविरुद्ध मोठी चपराक होती. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणारे एक धाडसी पाऊल होते हे आपण मान्य करणे महत्वाचे आहे. प्रजा व स्वराज्याची संकल्पना स्पष्ट होती 1772 रोजी एका पत्रामध्ये त्या पेशव्यांचा चांगलाच समाचार घेतात दिसतात! ब्रिटिशांना बरोबर हात मिळवणी करण्याबाबत त्या चांगलीच ताकीद देतात! एक छान पैकी उदाहरण देऊन त्यांना सांगतात वाघ व इतर प्राणी यांना शक्तीने व युक्तीने मारता येते परंतु अस्वलाला मारणे अवघड काम आहे. ब्रिटिशांशी हातमिळवणी करणे म्हणजे अस्वलास कवटाळणे होय अशा पद्धतीचे उपरोधात्मक टोलाही लगावतात .अस्वल एखादं शिकार आपल्या कवेत आलं की जोरात घट्ट पकडून गुदगुल्या करून मारते हे सुद्धा त्या सांगायला विसरले नाहीत अशा पद्धतीने त्यांची राष्ट्रभक्ती या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते. ब्रिटिशांशी पेशवाईशी दोन हात करण्याकरता ते मागेपुढे पाहत नाहीत .एवढेच नव्हे तर चोर दरोडेखोर हे राज्यातील प्रजेवर अन्याय करत असत.त्यांचे परिवर्तन करण्याचा उद्देशाने म्हशी ,जमिनी देऊन चोरी कमी करण्याचा प्रयत्न त्या करतात.शेती हे उपजीविकेचे साधन निर्माण झाल्यामुळे दरोडेखोरी चे प्रमाण अत्यल्प झाले त्यांचा उपाय म्हणजे प्रत्यक्ष कार्य होय.न्यायदानाच्या बाबतीत सुद्धा त्या कठोर होत्या प्रजेस त्रास देणारे व्यक्तीस त्या तोफेच्या तोंडी देण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचे कार्य अमुलाग्र असे होते त्यांच्या बाबतीत दैववाद करण्यात काही अपप्रवृत्ती फारच छंद आहे. हे आपणास नाकारून जमणार नाही देवत्व प्राप्त केले त्या व्यक्तीचे कर्तृत्व संपून जाते हे भारतातील वर्ण व्यवस्थेतील प्रकांड पंडितांना चांगलेच माहिती आहे म्हणून अहिल्या बाई होळकर की अहिल्यादेवी होळकर या वादात पडण्यापेक्षा आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजापुढे व देशापुढे प्राणपणाने मांडणे महत्वाच्याआहे.त्यांनी अनेक ठिकाणी विहीरी तलाव बांधून शेतीपूरक व्यवसायाबरोबरच अन्नछत्र आणि मंदिरे निर्माण सुद्धा केले आहे हा भाव त्यांचा समतेचा पाया आहे.
एक इंग्रज अधिकारी त्यांना केथरिन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट यांची उपाधी देतो हे काही कमी नाही. सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक संकटाना तोंड दिले होते.अशा या महान स्वराज्यातील मराठा साम्राज्यातील भटशाहीस आव्हान देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा 13 ऑगस्त 1795 रोजी मृत्यू झाला.आज त्यांच्या विचाराचा कार्याचा व दातृत्व आणि कर्तुत्वाचा विचार गरजेचाआहे. हे थोर विचार आपणाला एकसंघ ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसत आहेत.त्या म्हणतात
" *ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य असते*
*तोच खरा लोकाभिमुख राजा बनू शकतो"*
हा विचार आजही व्यवस्था परिवर्तनाच्या आखाड्यातील बहुजन बांधवास तारणारा आहे.त्या अर्थाने राजमाता या आम्हास सत्तेच्या अतुच्य शिखरावरील महाराणी आहेत .
दि.३१ मे २०२१
#जयमल्हार #जयजिजाऊ #जयभीम #जयभारत
लेखक –
डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन
मो.9881643650/7020400150
एखाद्या महापुरुष अथवा महानायिकांचे दैवतीकरण करणे आपण रोखले पाहिजे
सध्या आपल्या देशाला भक्तांची गरज नसून अनुयायांची गरज आहे.