मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु झाला आहे.
जवळपास तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं त्या फोनवरुन सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. तसेच मोठा फौजफाटाही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध घेत आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगण्यात आलं. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या गाड्याही मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. तसेच बॉम्बशोधक पथकासोबतच श्वान पथकंही मंत्रालयात दाखल झाली आहेत. कोणती संशयित वस्तू मिळतेय का? याचा कसून तपास केला जात आहेत. एक निनावी फोन मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये आला आणि त्या फोनवरुन बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ही माहिती खरी आहे का? याचा शोध सध्या पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाकडून घेतला जात आहे.