देसाईगंज शहरात दोन ठिकाणी चालतो ऑनलाईन मिनी कसीनो .
शहरातील लहान मुलांचे भविष्य धोक्यात..?
तरीही पोलीस प्रशासन झोपेत ❓ जनतेला पडला प्रश्न❓
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी /
चक्रधर मेश्राम
देसाईगंज शहरात मिनी कसीनो च्या नावाखाली चक्क मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने मोबाइल वर पॉईंट विकून खुलेआम सट्टाबाजार चालविला जात आहे यात देसाईगंज शहरातील बहुतांश लहान मुलांचा आणि कोरोना च्या काळात भरकटलेल्या युवा पिढीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे .
सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर तूकूम जवळील एका कॉम्प्लेक्स मध्ये तर लाखांदूर रोड वरील एका मोठ्या मालकाच्या कॉम्प्लेक्स च्या आतील रूम मध्ये चक्क पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकून शटर च्या आत मुलांना बसउन पॉईंट विक्री स्वरूपात हा गेम खेळला जातो. यामुळे आत युवा पिढीचे भविष्य खराब होताना दिसत आहे सदर दोन्ही ऑनलाईन जुगार अड्डे धारकांना सोबत देसाईगंज येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांची मीलीभगत असल्याची ही जोरदार चर्चा आहे ..पोलीस प्रशासनाने सदर जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी देसाईगंज येथील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.