विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन यावेळी इ.१० वी निकालासाठी विचारात घेण्यात आलेले आहेत.इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इ.११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) घेणार आहोत.
ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
इ. ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना CET मधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
CET दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांवर संबंधित परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर CET परीक्षा घेण्यात येतील. यासंदर्भातील स्वतंत्र नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल.
पहा शासन निर्णय परिपत्रक
page 1
page 2
page 4
CET #SSC #sscexam #FYJC #admissions
Email; janvidrohi@gmail.com
Editor 9881643650/7020400150
महत्वाच्या बातम्या साठी ग्रुप जॉईन करा whats अँप करा