यू ट्यूबवरील 55 सेकंदाच्या व्हिडीओमुळे एका कुटुंबाचे नशीबच पालटले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडत असून त्याचे लाईक आणि शेअर वाढत आहेत. या व्हिडीओची वाढती लोकप्रियता लक्षात घेता त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अवघ्या 55 सेकंदाचा व्हिडीओ तब्बल 5 कोटींमध्ये विकला गेला आहे.
वेबसाईड मेल ऑनलाईनने याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेतील आयटी कंपनीचे व्यवस्थापक हॉवर्ड डेव्हिस कैर यांनी मे 2007 मध्ये यू ट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत दोऊ भाऊ धम्माल,मजा, मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओत असलेल्या हॅरी आणि चार्ली यांचे वय तीन आणि एक वर्ष असे आहे.
ते दोघे एका खुर्चीत खेळत आहेत. त्यावेळी एका वर्षांच्या चार्लीने हॅरीचे बोट चावले. त्यानंतर हॅरी आपले बोट चार्लीला देत चाव, माझे बोट चाव असे म्हणत आहे.
हा व्हिडीओ गंमतीदार असल्याने तो यूट्यूबवर अपलोड केल्याचे हॉवर्ड यांनी सांगितले. या व्हिडीओला ‘ चार्ली बिट माय फिंगर’ असे नाव देण्यात आले. काही महिन्यांनी आपण हा व्हिडीओ हटवण्यास गेलो असता, हा व्हिडीओ हजारोवेळा पाहिल्याचे लक्षात आले. तसेच ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होते. नेटकरी हा व्हिडीओ एवढा का बघत आहे, असा प्रश्न ओआपल्याला पडला होता. या व्हिडीओत दोन भावांची धम्माल, मजा, मस्ती आहे, तरीही याला खूप लोकप्रियता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या एका व्हिडीओने या दोन भावांनी चांगली लोकप्रियता मिळाली आहे. तसेच कुटुंबालाही या व्हिडीओतून चांगली कमाई झाली आहे.
या व्हिडीओला अनेक जाहिराती मिळाल्या. त्यातूनही कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळाले आहे. याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता हा व्हिडीओ एनएफटीद्वारे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात या व्हिडीओला पाच कोटींचा अंतिम बोली लागली आहे. हा व्हिडीओ सुमारे 883 दशलक्ष वेळा बघितला गेला आहे. सर्वाधिक बघित्या गेलेल्या व्हिडीओपैकी हा एक आहे.
2007 मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमधील ही मुले आता मोठी झाली आहेत. हॅरी आता 6 फूट उंच झाला आहे. तर चार्ली 15 वर्षांचा असून तो शाळेत शिकत आहे. या व्हिडीओबाबत हॉवर्ड यांनी आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. हा व्हिडीओ त्यांच्या आजीआजोबांना पाठवायचा होता. मात्र, मेलवर पाठवण्यासाठी तो मोठा होता. त्यामुळे तो एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.