देशात कोरोना महामारीचे कंबरडे मोडले असताना आता खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते.त्यामुळे नफ्या तोट्याच गणित ढासळणार आहे.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता.
त्यामुळे मग फक्त DAPचीच दरवाढ कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते.
पण, आता सरकारनं DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहे.
खतांवरील अनुदानात वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. यामुळे सगळ्याच कंपन्यांची DAP खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.
याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयानं एक नोटिफिकेशन जारी केलं. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे.
केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. म्हणजेच खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.
2020-21मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलं होतं.
आता 2021-22च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्चित करण्यात आलं आहे.
खतांचे नवीन दर
भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. यंदा यूरियाचे दर ‘जैसे थे’ म्हणजेच ठेवण्यात आले होते. यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळणार आहे.
आता आपण कंपनीनुसार खतांच्या इतर ग्रेड्सच्या किंमती जाणून घेऊया.
इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) नवीन खतांचे दर जाहीर केलेत.
कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2021पासून या नवीन दरानं खतांची विक्री केली जाणार आहे.
🎯इफ्को कंपनीचे नवे दर
याशिवाय कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात असंही म्हटलंय की, बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दरानं विकण्यात येतील.
म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे, ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.
ADVENTZ ग्रूपअंतर्गत येणाऱ्या झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान या ब्रँड नावानं खत विक्री), मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (जय किसान मंगला या ब्रँड नावानं खत विक्री) आणि प्रदीप फॉस्फेट्स लिमिटेड (जय किसान नवरत्न या ब्रँड नावानं खत विक्री) या तिन्ही कंपन्यांचे त्यांचे नवीन दर जारी केले आहेत.
हे नवीन दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसंच या कंपन्यांनी जारी केलेल्या पत्रकात हेसुद्धा स्पष्ट केलंय की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRPच्या छापील बॅगासुद्धा नवीन दरानं विकण्यात येतील.
कोरोमंडल ही खत उत्पादक कंपनी ग्रोमोर या ब्रँड नावानं खताची विक्री करते.
कंपनीनं 20 मे 2021 पासून नवीन दर लागू केलेत. जुना स्टॉक किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची एमआरपी असेल तोसुद्धा या नवीन दरानेच विकावा, असंही सांगितलं आहे.
स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी ‘महाधन’ या ब्रँडखाली खंतांची विक्री करते.
20 मे पासून खतांची नवीन दरानं विक्री होणार आहे.