जनविद्रोही प्रतिनिधी/
प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू,सुशील कुमार याने २००८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. त्याने २०१२ झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर सुशील कुमारने भारतात खूप नाव कमावले. परंतु त्याने केलेल्या एका कृत्यामुळे तो नायकचा खलनायक झाला आहे. सध्या त्याच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. सुशील कुमारच नव्हे तर जगभरात अनेक खेळाडू आहेत, जे आपापल्या खेळात यशाच्या शिखरावर होते. परंतु काही कारणास्तव ते खलनायक बनायला भाग पडले.
प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार हा दिग्गज कुस्तीपटूंपैकी एक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुस्तीमध्ये २ पदक मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याच्या नावावर ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य आणि रौप्यपदके आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने युवा कुस्तीपटूची हत्या केली होती, ज्यामुळे त्याच्यावर हत्येचा आरोप आहे