सांगोला / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यसह सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने दिनांक 21 मे पासून पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊन ची सुरुवात केली असून त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळतआहे.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या हालचालींवर प्रशासणाचे सनियंत्रन व्यवस्थितपणे चालू आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा महत्वाचा पर्याय आहे.संध्या लॉकडाऊन मूळे सर्व प्रकारची वाहने, एस.टी.बसेस,खाजगी वाहने बंद आहेत.तसेच शहरातील सर्व हॉटेल्स,रेश्टारण्ट बंद आहेतः त्यामुळे रुग्ण,त्यांचे नातेवाइक तसेच शहरातील निराधार महिला,पुरुष लहान बालके यांच्या रोजच्या जेवणा चा मोठा प्रश्न असल्याचे व त्यातून त्यांची उपासमार होणार असल्याचे अस्तित्वच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यानी तालुक्यातील विविध दानशूर लोकांच्या सहकार्याने कम्युनिटी किचन अर्थात मोफत पार्सल भोजन व्यवस्था आकाराला आणली आहे त्याची सुरुवात काल 22 मे रोजी सांगोला एसटी.बस स्टँडवर तहसिलदार अभिजित पाटील,मुख्याधिकारी कैलास केंद्रे,यांच्या हस्ते फित कापून झाली यावेळी नूतन पोलिस निरीक्षक सुहास जगताप,जि.प.सदस्य अतुल पवार अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे,उपाध्यक्ष अरुण कसबे,संस्थेच्या सेक्रेटरी अँड.सुनीता धणवडे,समाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे,सांगोला आगाराचे उपव्यवस्थापक मा.कदम साहेब व अस्तित्व संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक,निराधार महिला,पुरुष यांना भोजन किट वाटप करण्यात आले
यावेळी समाजिक अंतर ठेऊन थोडक्यात कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.लॉकडाऊन असे पर्यंत साधारण 5 जून पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे यावेळी शहाजी गडहिरे यानी सांगितले आहे .गरीब व गरजू लोकांच्या सोयीसाठी एस.टी.बस स्टँडवर दुपारी 12 ते 2 या वेळेत कम्युनिटी किचन अर्थात मोफत पार्सल भोजन व्यवस्था सुरु राहणार असून त्याचा गरजू लोकानी लाभ घ्यावा असे आवाहन शहाजी गडहिरे यानी केले आहे. सुरुवात 50 प्लेट पासून केली असून आवश्यकता भासल्यास किंवा गरजू लोकांची संख्या वाढल्यास दररोज 100 लोकांना मोफत भोजन देण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितलेआहे.एस.टी.स्टँडवर भोजन वाटप करताना सामाजीक अंतर, मास्क,सनिटायझर व इतर कोरोना विषयक नियम पाळून हा उपक्रम लोकांसाठी राबवीत असून गरजू लोकांनी 9096589145 व 9960820677 आणि 9657869678 इत्यादी नंबर्स वर संपर्क करण्याचे आवाहनही शहाजी गडहिरे यानी केले आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय धनवडे, खंडेराव लांडगे,दिपाली भुसनर,प्रविण सूर्यगंध,
विशाल काटे,माधुरी मंडले इत्यादी परिश्रम घेत आहेत.