प्रतिनिधी/
कोविड 19 ची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून तो योग्य पण आहे.कोरोना व्हायरस चा प्रभाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा महत्वाचा पर्याय आहे.संध्या लॉकडाऊन मूळे सर्वच एस.टी.बसेस,खाजगी वाहने बंद आहेत.तसेच शहरातील सर्व हॉटेल,रेषटारट बंद आहेतः त्यामुळे रुग्ण,त्यांचे नातेवाइक,निराधार लोक यांची उपासमार होणार आहे म्हणुन आम्ही अस्तित्व संस्थेच्या वतीने अशा गरजू लोकांच्या सोयीसाठी उद्यापासून एस.टी.बस स्टँडवर दुपारी 12 ते 2या वेळेत कम्युनिटी किचन अर्थात मोफत पार्सल भोजन व्यवस्था करीत असून त्याचा गरजू लोकानी लाभ घ्यावा असे आवाहन शहाजी गडहिरे यानी केले आहे.उदया दुपारी 12वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करीत आहोत. सुरुवात 50 प्लेट पासून करीत असून आवश्यकता भासल्यास किंवा गरजू लोकांची संख्या वाढल्यास दररोज 100 लोकांना मोफत भोजन देण्याचे नियोजन करीत आहोत.एस.टी.स्टँडवर,हॉस्पिटलस वर भोजन वाटप करताना सामाजीक अंतर मास्क सनिटायझर व इतर कोरोना विषयक नियम पाळून हा उपक्रम लोकांसाठी राबवीत आहोत गरजू लोकांनी 9096589145 व 9960820677 आणि 9657869678 इत्यादी नंबर्स वर संपर्क करण्याचे आवाहनही शहाजी गडहिरे यानी केले आहे.