*तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलकडून दिल्या जाणार्या रेमडिसिवीर इंजेक्शनची व आकारण्यात येणार्या बिलाची प्रशासकीय अधिकारी नेमून तात्काळ चौकशीबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण*
अकलूज
तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलकडून दिल्या जाणार्या रेमडिसिवीर इंजेक्शनची व आकारण्यात येणार्या बिलाची प्रशासकीय अधिकारी नेमून तात्काळ चौकशीबाबत पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी अकलूज येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे ,माजी उपसरपंच डॉ तुकाराम ठवरे,जब्बार मुलाणी,रवी वाघमारे आदीनी पाठिंबा दिला आहे यावेळी कोरानाचा पादुर्भाव असल्याने आंदोलन मोजक्या लोकांत पार पडले यावेळी निवेदन नायब तहसिलदार यु आर देसाई व वरिष्ठ लिपिक कारंडे यांच्याकडे देण्यात आले
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळशिरस तालुक्यात कोवीडचा प्रार्दुभाव वाढला असताना प्रांत, तहसिल व आरोग्य प्रशासन सर्वसामान्यांची दखल घेत नाही अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असतानाही तालुक्यातील रुग्णांना उपलब्ध करुन दिले जात नाही तसेच खालील विविध मागण्यांसदर्भात प्रशासकीय अधिकारी नेमून तत्काळ चौकशी करावी ज्या हॉस्पिटलला प्रशासनाकडून रेमडिसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहे. त्या हॉस्पिटलमधे दिलेली वास्तविक इंजेक्शन आणि त्यांनी हॉस्पिटलमधील पेशंटला दिलेली इंजेक्शन यातील तफावताची चौकशी करण्यात यावी,शासन दराप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलने बील आकारणे गरजेचे असताना त्यांनी हा नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात पेशंटला घाबरवून मोठ्या प्रमाणात बिले आकारण्यात आलेली आहेत अशा सर्व हॉस्पीटलमधील कमीत कमी 3 महिन्याच्या बिलाची शासकीय ऑडीटदार नेमून ती तपासण्यात यावीत. त्यातील फरक पेशंटला माघारी देण्यात यावा, माळशिरस तालुक्यातील रुग्णवाहिकांचे दर निश्चित करण्यात यावे त्याचप्रमाणे हॉस्पिटलबाहेर शासन दराची फलक लावावा तसेच हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर दररोजचे दररोज हॉस्पिटलमधील पेशंटची, उपलब्ध बेडची संख्या व यादी नोटीस बोर्डवर लावण्यात यावी, म्युकर मायकोसीस यावरील इंजेक्शनची सोय ताबडतोब करण्यात यावी. तसेच त्यासाठी हॉस्पिटलमध्ये राखीव बेड ठेवण्यात यावेत अकलूज शहरातील अकलाई क्रिटीकेअर व अभय क्लिनीक या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करण्यात येत आहे,तसेच एम डी मेडिसीन यांच्या संमतीने सुरु असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोव्हीड पेशंट ऍडमिट होत आहेत परंतु या हॉस्पिटलमधील ऍडमिट पेशंटकडे एम डी डॉक्टरांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक मृत्यू त्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत त्या झालेल्या मृत्यूची चौकशी करावी,तसेच विनापरवाना व विधाऊट एम डी शिवाय असल्यालेल्या हॉस्पिटलवर कारवाई करावी तरी त्याचीही चौकशी प्रशासकीय पातळीवर करण्यात यावी
या प्रकारणाची योग्य ती चौकशी न केल्यास व याबाबतचा अहवाल सादर न केल्यास भविष्यात प्रांत कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून मी आत्मदहन करणार आहे होणार्या परीणामास प्रशासन पुर्णतः जबाबदार असणार असल्याचा इशारा पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी यावेळी दिला आहे