प्रतिनिधी/ चक्रधर मेश्राम
आंतरराष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार.
कोविड 19 योध्दा पुरस्काराचे वितरण.
राजमाता जिजाऊ स्मृती कार्यक्रमात होणार गौरव.
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 18/मे.2021
समाजसुधारक, समाजसेवक, संत आणि राजकीय पुढाऱ्यांची खाण असलेल्या अखंड महाराष्ट्राच्या भूमीवर राजमाता जिजाऊ स्मृती दिनाचे औचित्य साधुन बेटी फाऊंडेशन वणी, जि. यवतमाळ च्या वतीने 2020- 21 या वर्षीचे आंतरराष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार, आणि महाराष्ट्र राज्य कोविड-19 योध्दा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकन दिनांक 15 जून पर्यंत दाखल करावे. 3 जुलै 2021 रोजी राजमाता जिजाऊ स्मृती दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तरी इच्छुक समाज सुधारक आणि सेवकांनी आपल्या संपूर्ण माहितीसह, प्रिती दरेकर,, बेटी फाऊंडेशन वणी, जिल्हा – यवतमाळ. भ्रमणध्वनी – ( 7972514099 ) येथे पाठवावे.