प्रतिनिधी/
माळशिरस तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराबाबत तसेच आरोग्य
व महसुल प्रशासनाच्या गलथान कारभाराची कसून शासकीय चौकशी करणेची मागणी पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते अजय सकट यांनी प्रांताधिकारी शमा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली व चौकशी न केल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या माळशिरस तालुक्यात कोवीडचा प्रार्दुभाव वाढला असताना प्रांत, तहसिल व आरोग्य प्रशासन सर्वसामान्यांची दखल घेत नाही. हेल्पलाईन सुरु करुनही हॉस्पिटल, बेड उपलब्ध करुन देत नाहीत उलट पेशंटच्या नातेवाईकांना रेमडिसिअर उपलब्ध करण्याचा आग्रह धरत आहे एका बाजूला शासन ज्याला गरज आहे अशा पेशंटला रेमडिसिअर देण्याची मागणी करत असताना हॉस्पिटल मात्र ही इंजेक्शन उपलब्ध करण्याचा आग्रह धरत आहे तर दुसरीकडे प्रशासन एकाच हॉस्पिटलला जादा इंजेक्शन देतात तर दुसरीकडे कमी देतात. यामुळे जेथे गरज जास्त आहे तेथे इंजेक्शन कमी प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत तसेच यामुळे अनेक हॉस्पिटलमधून इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे मोठ्या रकमेच्या बदल्यात इंजेक्शन विकले जात आहे पेशंटकडून मोठ्या प्रमाणात जादा बिल घेत आहेत माळशिरस तालुक्यातील अकलूज व इतर गावांतील खाजगी हॉस्पिटलमध्ये शासनाकडून प्रत्येक हॉस्पिटलनीहाय रेमडीशिवर इंजेक्शन दिले असताना अनेक हॉस्पिटलमधून इंजेक्शन योग्य त्या पेशंटला पोहोचली नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचा नाहक बळी गेलेला आहे त्यामुळे अशा सर्व हॉस्पिटलची शासकीय चौकशी करून प्रशासनाने दिलेल्या रेमडीशिवर इंजेक्शन व डॉक्टरानी रुग्णाला दिलेल्या हॉस्पिटलमधून इंजेक्शनची चौकशी करावी तसेच माळशिरस तालुक्यातील किती रुग्णांना ती दिली आहेत त्याचीही चौकशी करण्यात यावी यामध्ये दोषी असणार्या प्रशासनातील अधिकारी व डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी तसेच हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बील आकारणी होत नाही रुग्णांच्या नातेवाईकाना नाहक बिल खाजगी हॉस्पिटलला द्यावे लागते वास्तव बिलाच्या बाबतीमध्ये होत असणारी सर्वसामान्य रुग्णाच्या पिळवणूक व रेमडीशिवराची चौकशी करावी तसेच त्याचा काळाबाजार कसा झाला तालुक्यातील कोणत्या हॉस्पिटलाचा लागेबांधे आहेत का? तसेच ज्या रुग्णाची शासनदारापेक्षा जादा बिल घेतले आहे ते तपासून त्यातील फरक परत करण्यात यावा या सर्व प्रकारचा छडा लावण्याबाबत गुरुवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रांत ऑफिस कार्यालय समोर मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.
या प्रकारणाची योग्य ती चौकशी न झाल्यास व याबाबतचा अहवाल सादर न केल्यास 23 मे रोजी सकाळी 11 वा. प्रांत कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून मी आत्मदहन करणार आहे. होणार्या परीणामास प्रशासन व खाजगी हॉस्पीटल पुर्णतः जबाबदार असणार आहे
या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री, सोलापूर मा. दत्तात्रय मामा भरणे,जिल्हाधिकारी सोलापूर,मा. आरोग्य अधिकारी जि.प.सोलापूर मा. तालुका आरोग्य अधिकारी, पं.स.माळशिरस,मा. डॉ. शहा, नोड्युल ऑफिसर, ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय,अकलूज
मा. पोलीस निरीक्षकसोा. अकलूज यांना पाठविण्यात आल्या आहेत