प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यात शिवसेना कोरोना रुग्णसेवा व मदत कार्य समितीची स्थापना…
समिती अध्यक्षपदी स्वप्निल वाघमारे यांची निवड
शिवसेना उपनेते सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आ. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पंढरपूर विभागातील तालुकानिहाय आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कोरोणा संदर्भात उपाय योजनेचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शन करून मुख्यमंत्री मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने “ब्रेक दि चेन” ही योजना राबवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची विभाग व तालुका निहाय रुग्णसेवा व मदतकार्य समितीची स्थापन केली आहे.
या बैठकीस शिवसेना जिल्हा समन्वयक मा. श्री. शिवाजीराव सावंत सर जिल्हाप्रमुख मा. श्री. संभाजीराजे शिंदे, उपजिल्हा प्रमुख मा. श्री. दत्ता (आबा) पवार, माळशिरस तालुका प्रमुख मा. श्री. नामदेव (नाना) वाघमारे, युवासेना जिल्हाप्रमुख मा. श्री. स्वप्नील (भैया) वाघमारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली सदर बैठकीत माळशिरस तालुका कोरोणा रुग्णसेवा व मदतकार्य समितीची स्थापना झाली.
माळशिरस तालुक्याच्या समितीच्या अध्यक्षपदी युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्निल वाघमारे, उपाध्यक्ष पदी दत्तात्रय (आबा) पवार व प्रमोद उर्फ अण्णा कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी नामदेव वाघमारे, सचिव पदी दत्तात्रय गोरे, समन्वयक पदी महादेव बंडगर तर सदस्यपदी नितीन वाघमारे, अकबर तांबोळी, अमोल ऊराडे, उमेश जाधव, विवेक देशमाने, दादासाहेब ननवरे, प्रताप सरगर, साईनाथ जाधव, रणजित दादा गायकवाड, फारुक शेख, नवनाथ राऊत व गणेश इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
माळशिरस तालुका अंतर्गत कोरूना रुग्णांवर उपचार करत असताना येणाऱ्या अडचणी रिमेडीसिवीर इंजेक्शन पुरवठा, बेडची उपलब्धता, महात्मा फुले जन आरोग्य योजने सारख्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे, शासनाच्या नियमानुसार कोरोणा रूग्णांवर उपचाराचे १० दिवसांचे बिल जास्तीत जास्त ५७ हजार रुपये आकारण्यात येते का याची पाहणी करणे, हॉस्पिटल निहाय शासननियुक्त ऑडिटर यांच्या ऑडिटचा पाठपुरावा, संबंधितांना आवश्यक असलेली औषधे रास्त दरात उपलब्ध करून देणे, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नावाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे, शासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जाहीर केलेले अन्नधान्य वाटप सुरळीतपणे होत आहे का? याची दक्षता घेणे, राज्य शासनाने जाहीर केलेले १५०० रुपयांचे अर्थसाह्य पात्र रिक्षाचालक व बांधकाम कामगारांना मिळाले का नाही यासाठी पाठपुरावा करणे, कोरोना परस्थिती सर्वसामान्य जनतेची कुठे फसवणूक वा दिशाभूल होत असल्यास प्रशासनास कळवणे तसेच वेळोवेळी नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदन तक्रारींचे निवारण करण्यासाठी पाठपुरावा करणे आदी जबाबदारी या समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे व शिवसेना तालुकाप्रमुख नामदेव (नाना) वाघमारे यांनी दिली आहे.