अस्तित्व संस्थेच्या वतीने कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉनसेट्रेटर तहसीलदार यांचेकडे सुपूर्द
———————————————–
ऑक्सफाम इंडिया च्या सहकार्याने व अस्तित्व संस्थेच्या वतीने कोविड 19 रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉनसेट्रेटर अस्तित्व चे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांचे कडून तहसीलदार अभिजित पाटील नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आले.यावेळी अस्तित्वच्या सचिव सुनिता धणवडे,प्रविण सुर्यगध,चिदानंद स्वामी ,जितेंद्र गडहिरे,संकल्प गडहिरे,विशाल काटे इत्यादी उपस्थित होते.
अस्तित्व संस्था ही सांगोला,मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे.गेल्या महिन्यापासून कोविड 19 चे रुग्ण ग्रामीण भागात अधिक आहेत.दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ्च होत आहे.रुग्ण संख्या वाढत असल्याने सांगोला शहरातील हॉस्पिटल फुल्ल आहेत,बेड शिल्लक नाहीत,ऑक्सिजन चा तुटवडा आहे.ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले आहेत.ही बाब अस्तित्व च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने अध्यक्ष शहाजी गडहिरे यानी ऑक्सफाम इंडिया कडे आबाहन करून दोन ऑक्सिजन कॉंनसेंट्रेटर मशिन मिळवल्या.त्या मशिन काल मा तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या या मशिनमूळे गरीब रुग्णाना थोडासा तरी दिलासा मिळेल.
” सांगोला तालुक्यात वाढते कोरोना बाधितांची संख्या पाहता अक्सिजन कॉन्स्ट्रेटर अस्तिव संस्थेने सुपूर्द केल्याबद्दल तुमचे व अस्तित्व संस्थेचे आभार व अभिनंदन”
—-अभिजित पाटील सांगोला तहसीलदार
गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्व संस्था सामाजीक मुद्द्यांवर काम करते आहे.गेल्या वर्षभरात सुरु असलेल्या ताळेबंदीचा फटका मजुराना,भटके विमुक्त समाजाला व ग्रामीण कारागिरांना बसला आहे.आशा गरिबांना जगण्याचे बळ अस्तित्व च्या कार्यकर्त्यांनी दिलें आहे.
सध्या अस्तित्व च्या माध्यमातून सांगोला,पंढरपूर येथें कोविड रुग्णांसाठी मदतकक्ष सुरु केले असून त्या माध्यमातून रुग्णाना विविध योजनांची माहिती देणे,बेड ऊपलब्धतेची माहिती देणे अशी कामे केली जात आहेत.
यापुढेही शक्य ती मदत प्रशासनाला करू असे शहाजी गडहिरे यानी सांगीतले आहे.
यां मदतीबद्दल जिल्हाधिकारी मा मिलिंद शंभरकर,तहसीलदार मा अभिजित पाटील यानी अस्तित्व संस्थेचे व शहाजी गडहिरे यांचे विषेश आभार मानले आहेत.